हिंगोली : आमदाराच्या बंडखोरीनंतर शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज हिंगोली येथे आयोजित बैठकीत फोनद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. “कोण आले, कोण गेले, मला त्याची पर्वा नाही, तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा, मी पुन्हा लढणार आहे. पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना ताकदीनिशी उभी करणार आहे” असं उद्धव ठाकरे फोनवरुन कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले. शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी गट बदलल्याच्या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव त्यांनी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात शिवसैनिकांसोबत आयोजित बैठकीत ते फोनद्वारे बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, की तुमचा आवाज तुमच्यासोबत असलेल्या यापूर्वीच्या सहकाऱ्यांना जाऊ द्या.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

शिवसेना आमदार संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात असत. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणारे बांगर अचानक पलटले. दुसऱ्या दिवशी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मतदान करताना त्यांनी एकनाथ शिंदे गटात उडी घेतली. त्यामुळे शिवसेना व उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंसमोर आता संघटना वाचवण्याचं ‘चॅलेंज’; पुण्यात शिवसेनेला खिंडार

संतोष बांगर हे हिंगोलीचे गेल्या १७ वर्षांपासून जिल्हाप्रमुख होते. त्यांची रिक्त जागा झालेली जागा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भरली जाणार आहे. उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील सर्व शिवसैनिकांना मान्य असेल, असं यावेळी आनंदराव जाधव यांनी म्हटलं आहे. या बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्यासोबतच हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

हेही वाचा : ‘मध्यावधी निवडणुका घ्या, शिवसेना १०० जागा जिंकेल’; शिंदे-फडणवीसांना ओपन चॅलेंज

बंडखोर आमदार फुटल्यानंतर संतोष बांगर मतदारसंघात येऊन कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले होते. ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, त्या आमदारांना त्यांची बायकोसुद्धा सोडून जाईल, त्यांच्या मुलांना कोणी बायका देणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य बांगर यांनी केलं होतं.

हेही वाचा : संतोष बांगरांचा रात्री १.३० ला फोन, म्हणाले मी येतो, आणखी ३-४ आहेत, शिंदेंनी बॉम्ब फोडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here