
मुंबईला ऑरेंज आणि दक्षिण कोकणात रेड अलर्ट जारी
या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच, पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
मुंबईतही दोन दिवसांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे. मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. तर लोकल ट्रेनही अपेक्षित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु आहेत. मुसळधार पावसाचा लोकलच्या तिन्ही मार्गांना मोठा फटका बसला आहे. तर अनेक भागांतील रस्ते हे जलमय झालेले पाहायला मिळत आहेत.
मुंबईत जोरदार पाऊस; सायन, अंधेरी सब वे मध्ये रस्ते तुडूंब, वाहतुकीवर परिणाम