मुंबई: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध या व्यक्तिरेखेची बरीच चर्चा आहे. या पात्राचा राग यावा इतका सहजसुंदर अभिनय करणाऱ्या मिलिंद गवळी यांचं कौतुक होतंय. मिलिंद सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. त्यांचे अनुभव, चाहत्यांच्या प्रतिक्रिया, सेटवरील किस्से मिलिंद त्यांच्या पोस्टमधून चाहत्यांपर्यंत पोहोचवतात.

मिलिंद यांनी नुकतीच शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारमंडळी त्यांचे अनुभव शेअर करताना दिसतात. मिलिंद यांनी देखील त्यांचा वारीत आलेला अनुभव शेअर केला आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते वारीत सहभागी झाले होते. २१ वर्षांपूर्वीचा हा अनुभव आहे.
अशोक सराफ यांना अशी वागणूक का? ‘चला हवा येऊ द्या’वर प्रेक्षक भडकले
‘विठ्ठल विठ्ठल’ या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्तानं मिलिंद यांची वारी घडली होती. शूटिंगसाठी ते साधूच्या वेशात होते. सीनसाठी वेळ असल्यानं ते एका ठिकाणी साधूच्या वेशात बसले होते. तेव्हा तीन, चार महिला आल्या आणि त्यांच्या पायावर डोकं टेकवत पाया पडल्या. एक वृद्ध महिला तिथं आली आणि, बाबा मला आशिर्वाद द्या आता मी शांतपणे डोळे मिटू शकेन, असं म्हणाल्या. यावर मिलिंद म्हणाले की, आजी त्या विठ्ठलाच्या पाया पडा, माझ्या नको. मी केवळ एक कलाकार आहे. यावर त्या आजी म्हणाल्या की, नाही बाळा ,तूच मला आशिर्वाद दे ,कारण मला तुझ्यामध्ये विठ्ठल दिसतोय’.
‘देवमाणूस २’मध्ये आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री, चर्चा मात्र वेगळीच
असा हा काहीसा विलक्षण अनुभव मिलिंद यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

कलाकाराच्या आयुष्यातील भूमिकेचं महत्त्व
कलाकारचं आयुष्य किती वेगळं आणि सुंदर आहे बघा ,एका बाजूला अनिरुद्ध देशमुखला एक बाई चपलेने मारेन असं म्हणते आणि ‘विठ्ठल विठ्ठल’ या भूमिकेसाठी एका बाईला माझ्यामध्येच विठ्ठल दिसतो ,पांडुरंग दिसतो . विलक्षण नाही का हे सगळं , असंही मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वाचा मिलिंद गवळी यांची पोस्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here