कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठा फटका बसलेल्या शिवसेनेने तातडीने नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करत पक्ष मजबुतीला प्रारंभ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरप्रमुख म्हणून दोघा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविकिरण इंगवले व सुनील मोदी यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ‘मोदी’ मैदानात उतरल्याचा अजब योगायोग पाहायला मिळत आहे.

पंधरा दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा उभारला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार आणि नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागरही सहभागी झाले. आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या बंडामुळे सेनेला मोठा धक्का बसला.

त्या पाठोपाठ क्षीरसागर यांनीही शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरात शिवसेनेला चांगलाच धक्का बसला. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता पुन्हा एकदा पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेक पदाधिकाऱ्यांच्या सोमवारी नियुक्ती करण्यात आल्या.

हेही वाचा : काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता : उद्धव ठाकरे

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी शहर प्रमुख म्हणून सुनील मोदी तर कोल्हापूर दक्षिण शहर विधानसभा मतदारसंघासाठी रविकिरण इंगवले यांची शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहर समन्वयक म्हणून हर्षल सुर्वे यांची नियुक्ती पक्षाने केली आहे. याबरोबरच पोपट दांगट, अवधूत साळोखे यांची उपजिल्हाप्रमुख तर प्रतिज्ञा उत्तुरे व प्रीती क्षीरसागर यांची शहर संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, गाड्यांच्या लांबच लांब रांगा

कोण आहेत इंगवले आणि मोदी?

इंगवले हे माजी शहर प्रमुख तसेच महापालिकेचे माजी उपमहापौर व स्थायी समितीचे माजी चेअरमन आहेत. मोदी हे महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती आहेत. त्यामुळे बंडाळीनंतर नवा जोश भरण्याचा प्रयत्न शिवसेनेला कितपत फायद्याचा ठरतोय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Kolhapur Modi Ingawale

रविकिरण इंगवले व सुनील मोदी

हेही वाचा : चार जणांच्या कोंडाळ्याने ठाकरेंना बावळट बनवलं, गुलाबरावांनी उल्लेख केलेले चौघे कोण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here