Mumbai Rains : राज्याची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आज मुसळधार पावसाने थांबली. मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज जारी केला आहे. पुढील काही दिवसांत ठाणे जिल्ह्यातही मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा आयएमडीने दिला आहे.

हवामान खात्याकडून मुंबई आणि ठाण्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांत विविध ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अशात या रेड, ऑरेंज, आणि यलोअलर्टचा अर्थ काय? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. जाणून घेऊयात सविस्तर…

Mumbai Rains High Alert : पुढचे ३-४ तास मुंबईसाठी हायअलर्ट, हवामान खात्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा
खरंतर, हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी IMD कडून चार रंगाचा कोड म्हणून वापर केला जातो. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, यलोआणि रेड अशा रंगाचा वापर होतो.

रेड अलर्ट म्हणजे काय? (Red Alert Meaning)
जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात.

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय? (Orange Alert Meaning)
हवामान खात्याकडून मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो. याचा अर्थ असा की, अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. इतकंच नाहीतर ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा नागरिकांनाही अवश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात. कारण, यावेळी अनेक समस्या येऊ शकतात.

Konkan Rains Update: मुंबई-गोवा हायवेवरील परशुराम घाट बंद; कोकण-गोव्यात जाण्यासाठी जाणून घ्या पर्यायी मार्ग
यलो अलर्ट म्हणजे काय? (Yellow Alert Meaning)
हवामान खात्याकडून अनेक शहरांना यलोअलर्ट दिला जातो. याचा अर्थ असा होतो की, संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या जनजीवनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात.

ग्रीन अलर्ट अलर्ट म्हणजे काय? (Green Alert Meaning)
पावसाळ्यात अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट असतो. याचा अर्थ की, संबंधित शहरांमध्ये पावसाची परीस्थिती सामान्य असेल. यावेळी कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते.

Orange Alert to Mumbai: पावसाचा धुमाकूळ; मुंबईला ऑरेंज आणि दक्षिण कोकणात रेड अलर्ट जारी
राज्याला अतिवृष्टीचा इशारा
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्यामुळे मुंबई-ठाण्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि महाराष्ट्रातील इतर अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री अलर्ट मोडवर…
या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच, पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

मुंबईत जोरदार पाऊस; सायन, अंधेरी सब वे मध्ये रस्ते तुडूंब, वाहतुकीवर परिणाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here