हरदोई: उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये ४ हात आणि ४ पायांचं बाळ जन्माला आलं आहे. नवजात मूल पूर्णपणे ठीक आहे. काही जण या बाळाला निसर्गाचा चमत्कार म्हणत आहेत, तर काही जण त्याची तुलना देवाच्या पुनर्जन्माशी करत आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जुळ्या बाळाशी संबंधित आहे. मात्र दुसऱ्या बाळाच्या शरीराचा विकास पूर्णपणे होऊ शकलेला नाही. त्यामुळेच जन्माला आलेल्या बाळाला दोन अतिरिक्त हात आणि पाय आहेत.

बाळ जन्माला येताच त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. उत्तर प्रदेशच्या हरदाई जिल्ह्यातील शाहबाद कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये गेल्या आठवड्यात बाळाचा जन्म झाला. बाळाचं वजन जवळपास ३ किलो इतकं आहे.
Chandrashekhar Guruji Murder: ‘सरळवास्तू’च्या चंद्रशेखर यांची निर्घृण हत्या; हल्लेखोर आधी पाया पडले, मग चाकूनं वार केले
२ जुलैला बाळाच्या आईला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला रुग्णालयात आणण्यात आलं. २ जुलैला तिची प्रसूती झाली. बाळाच्या जन्माची माहिती आसपास पसरताच त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. आई आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम आहे. बाळाला उपचारांसाठी आधी शाहाबादहून हरदोईला आणि मग तिथून हरदोईला पाठवण्यात आलं.

महिलेला जुळी मुलं होणार होती. मात्र दुसऱ्या बाळाचं विकास व्यवस्थित झाला नाही, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. रमेश बाबू यांनी दिली. बाळाच्या पोटावर दुसऱ्या बाळाचं धड जोडल्यासारखं दिसत आहे. मात्र ते पूर्णपणे विकसित झालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं.
रिलेशनशीप तोडण्यास शिक्षिकेचा नकार, वारंवार धमक्या, बारावीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल
१७ जानेवारीलादेखील समोर आला होता असाच प्रकार
या वर्षाच्या सुरुवातीला, १७ जानेवारीला बिहारच्या कटिहारमधील जिल्हा रुग्णालयात ४ हात आणि ४ पाय असलेल्या बाळाचा जन्म झाला. बाळाच्या जन्मापूर्वी त्याच्या वडिलांनी अल्ट्रा साऊंड केलं होतं. मात्र त्याचा अहवाल चांगला आला होता. बाळ व्यवस्थित असल्याची माहिती अहवालातून समोर आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here