मुंबई: काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. शिंदे यांच्यावरील टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. आम्ही रिक्षावाले असू तर आम्हाला त्याचा अभिमान आहे. मोदींच्या कार्यकाळात सर्वसामान्य माणूसच राजा आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या लोकांनी हे समजून घ्यायला हवं, असं फडणवीसांनी ठाकरेंना ठणकावून सांगितलं.

उद्धव ठाकरेंनी रिक्षावरून केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे. ‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!’, अशा शब्दांत शिंदेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे बऱ्याचदा मर्सिडीजमधून प्रवास करतात. त्यांच्या ताफ्यात काही मर्सिडीज कार आहेत. तो धागा पकडत शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

१० दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने काल विधानसभेत १६४ आमदारांच्या भक्कम पाठिंब्यावर विश्वासदर्शक ठराव जिंकला. अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. तब्बल पावणे दोन तासांच्या भाषणात त्यांनी सत्तांतराचं नाट्य कसं घडलं, हे सांगितलं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी शिंदे-फडणवीसांना आजे टोले लगावले.
गद्दारांचं विकृत हसू, निष्ठावंतांच्या डोळ्यात अश्रू यातून नक्की मार्ग काढणार : उद्धव ठाकरे
शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख, संघटक यांची शिवसेनाभवनात बैठक संपन्न झाली. अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. शिवसेनेच्या रणरागिणी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत कार्यरत राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. कोण आलं, कोण गेलं याचा मला फरक पडत नाही. ज्यांना लढायचं असेल, त्यांनी माझ्यासोबत राहावं, पुन्हा नव्याने जोमाने शिवसेनेला उभा करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले रिक्षावाला सुस्साट, फडणवीस म्हणतात, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले…
“काल विधानसभेत काय काय घडलं, हे आपण पाहिलं. काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच लागत नव्हता. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरचा माईक खेचला. पुढच्या काळात काय काय खेचतील, कळणार पण नाही”, असा चिमटा ठाकरेंनी काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here