सांगली : दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी आमदारकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. रोहित पाटील यांचा नुकताच वाढदिवस पार पडला. समर्थक आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि थाटात साजरा केला. बॅनरबाजी केली. पण रोहित पाटील यांच्या समर्थनार्थ केलेल्या बॅनरवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे फोटो मात्र गायब आहेत.

राज्यात १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर शिंदे फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. पण हे सरकार स्थापन होऊन काहीच तास झाले होते, तोच शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीचं भाकित वर्तवलं. शरद पवार यांनी तर मध्यावधी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेशच राष्ट्रवादीच्या आमदारांना दिले. रोहित पाटीलही याच आदेशाची वाट पाहत असावेत. झालं तर मग… आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

शरद पवारांच्या पावलावर पाऊल, शिंदेंची बंडखोरी ३ कारणांनी ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी
रोहित पाटील यांचा सोमवारी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. समर्थक कार्यकर्त्यांनी तर जिकडं बघावं तिकडं होर्डिंग्ज लावले होते. त्या बॅनर्सवर भावी आमदार म्हणून त्यांचा उल्लेख केला होता. मात्र या बॅनर्सवर ना शरद पवार यांचा फोटो दिसून आला ना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा… त्यामुळे रोहित पाटील यांनी लावलेल्या या बॅनर्सची आणि त्यामागील राजकीय तर्कवितर्काची मतदारसंघात जोरदार चर्चा सुरु आहे.

भाजप नेत्यांकडून ईडी सीबीआयची धमकी, दीवार चित्रपटातील डायलॉग सांगत केजरीवालांचं प्रत्युत्तर
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी सारे दिग्गज मैदानात उतरुनही रोहित पाटील यांनी साऱ्यांना धूळ चारत नगरपंचायतीची सत्ता मिळवली. त्यामुळे रोहित पाटील यांचा विश्वास चांगलाच दुणावला आहे. त्यामुळेच रोहित पाटील यांनी आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू केली आहे.

आमदार फुटले, पण कार्यकर्ते नाही, समर्थकाचं स्वत:च्या रक्ताने उद्धव ठाकरेंना पत्र
कोण आहेत रोहित पाटील?

रोहित हे आर आर पाटील यांचे चिरंजीव आहेत,राष्ट्रवादीचे युवा नेते आहेत
सेम टू सेम आबांसारखी भाषण, त्यामुळे राज्यभर लोकप्रिय आहेत
विधानसभा २०१९ निवडणुकीवेळी वयाची अडचण असल्याने ते उभे राहू शकले नाहीत
मात्र आता पंचवीशी ओलांडल्याने यावेळी ते नक्की विधानसभा लढवणार, त्याची आत्तापासूनच तयारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here