Authored by Maharashtra Times | Updated: Jul 5, 2022, 10:01 PM

भारताला कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतरही भारताचा कर्णधार जसप्रीत बुमरासाठी एक गूड न्यूज आली आहे. बुमराला यावेळी मालिकावीर घोषित केले आहे. या मालिकेत सर्वाधिक ७३७ धावा या जो रुटने केल्या होत्या, पण तरीही मालिकावीर हा पुरस्कार जसप्रीत बुमराला कसा काय देण्यात आला, याची जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे.

 

जसप्रीत बुमरा (सौजन्य-ट्विटर)

हायलाइट्स:

  • पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा सात विकेट्सने पराभव झाला.
  • या मालिकेत सर्वाधिक ७३७ धावा जो रुटने केल्या होत्या.
  • पण तरीही जसप्रीत बुमराला मालिकावीराचा पुरस्कार कसा मिळाला, पाहा…
बर्मिंगहम : भारताला इंग्लंडविरुद्धचा सामना गमवावा लागला. जॉनी बेअरस्टो आणि जो रुट हे या सामन्याचे हिरो ठरले. कारण कठीण प्रसंगी या दोघांनी द्विशतकी भागादारी रचत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण तरीही सामना संपल्यार भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराची निवड करण्यात आली. या मालिकेत सर्वाधिक ७३७ धावा या जो रुटने केल्या होत्या, पण तरीही मालिकावीर हा पुरस्कार जसप्रीत बुमराला कसा काय देण्यात आला, याची जोरदार चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे.
जसप्रीत बुमराला कसा देण्यात आला मालिकावीराचा पुरस्कार, जाणून घ्या…
जा खेळाडू मालिकेत छाप पाडतो, त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात येतो. हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना होता. गेल्या दौऱ्याच्या वेळी चार कसोटी सामने खेळवले गेले होते आणि त्यामध्ये भारताने २-१ अशी आघाडी घेतली होती. पण बुमराच्या नेतृत्वाखाली भारताला हा सामना गमवावा लागला आणि त्यांच्या हातून मालिका विजयाची सुवर्णसंधी निसटली. पण तरीही पराभूत झालेल्या संघाचा कर्णधार बुमराला यावेळी मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कारण या मालिकेत सर्वाधिक बळी बुमराने पटकावले. बुमराने या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकूण २३ बळी मिळवले, जे सर्वाधिक आहेत. कारण या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे जेम्स अँडरसन आणि ऑली रॉबिन्सन आहेत. या दोघांनी प्रत्येकी २१ बळी मिळवले आहेत. त्यामुळे सर्वाधिक बळी बुमराच्या नावावर आहेत. त्याचबरोबर बुमराने या सामन्यात धडाकेबाज फटकेबाजी करत विश्वविक्रमही नोंदवला होता. त्यामुळे एकंदरीत पाचही सामन्यांमध्ये बुमराने छाप पाडल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळेच त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर बुमराने यावेळी अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

बुमराने या मालिकेत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कारण आतापर्यंत भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला इंग्लंडमध्ये खेळत असताना २३ विकेट्स मिळवता आल्या नव्हत्या. त्यामुळे इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक बळी मिळवणारा भारतीय गोलंदाज बुमरा ठरला आहे. बुमराने पाचव्या सामन्यात फलंदाजी करत असताना विश्वविक्रम केला होता. बुमराने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात तब्बल ३५ धावा वसूल केल्याचे पाहायला मिळाले होते. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात ३५ धावा कधीही काढल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे बुमरा प्रकाशझोतात आला होता.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : india lost the match but how jasprit bumrah became player of the series
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here