वाचा-‘एलआयसी’ वधारतोय; शेअर गेला ७०० रुपयांवर,’या’ ब्रोकर्सकडून २० टक्के तेजीचा अंदाज
राजधानी नवी दिल्लीत १९ किलोचा गॅस सिलेंडर २ हजार १२.५०, मुंबईत २ हजार १३२, कोलकातामध्ये १ हजार ९७२.५० तर चेन्नईत २ हजार १७७.५० रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत १४.२ किलोच्या गॅस सिलेंडरसाठी १ हजार ५२ रुपये द्यावे लागतील. चेन्नईत यासाठी १ हजार ६८ तर कोलकातामध्ये १ हजार ७९ रुपये मोजावे लागतील.
वाचा- आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख कधी? करदात्यांनो जाणून घ्या सविस्तर माहिती
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत याआधी १९ मे रोजी बदल करण्यात आले होते. दुसऱ्या बाजूला व्यवसायिक कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीत एका महिन्यात दुसऱ्यांदा कपात झाली आहे. एक जुलै रोजी त्याच्या किमतीत १९८ रुपयांनी मोठी घट करण्यात आली होती.
व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमती (१९ किलो)
दिल्ली- २ हजार १२.५० रुपये
मुंबई- १ हजार ९७२.५० रुपये
कोलकाता- २ हजार १२.५० रुपये
चेन्नई- २ हजार १७७.५० रुपये