Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईसोबत फर्निचरच्या दुकानात गेलेल्या अवघ्या ६ वर्षाच्या चिमुरड्यासोबत असं काही घडलं की त्याचा थेट मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

 

Pimpri grinder machine incident
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय बालकावर ग्राइंडिंग मशीन पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सांगवी परिसरात मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरात एक ६ वर्षीय चिमुरडा आपल्या आईसोबत फर्निचरच्या दुकानात आला होता. त्यावेळी त्याची आई दुकान मालकाशी बोलत असताना मुलगा ग्राइंडिंग मशीनच्या जवळ गेला आणि ग्राइंडिंग मशीनला फिट केले नसल्याने ती मशीन त्याच्या अंगावर पडली.

Pune Weather : ऑरेंज अलर्ट असूनही पुणेकरांसाठी Good News, भुशी डॅम ओव्हरफ्लो; उच्चांकी पावसाची नोंद
क्षणात मुलाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला आईने तात्काळ जवळच्या रुग्णालय दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Deadliest Beaches in Mumbai: मुंबईकरांनो सावधान! ‘हे’ दोन समुद्रकिनारे आहेत सर्वात धोकादायक

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : pimpri chinchwad news 6 year old boy dies after falling on grinder machine incident captured on cctv
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here