मुंबई: हिंदी टीव्ही सृष्टीतील अभिनेत्री देबिना बॅनर्जी बाळाची आतुरतेनं वाट पाहत होती. काही महिन्यांपूर्वीतिच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. तिचा नवरा आणि अभिनेता गुरमीत चौधरीनं एक खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. दोघांनी नुकताच तिचा फोटोही चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
आई झाल्यानंतरही देबिना सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिनं तिचा अनुभव चाहत्यांसोबत अनेकदा शेअर केलाय. देबिना आणि गुरमीत त्यांच्या चिमुकलसोबत फिरायला गेले आहेत. त्याच्या लेकीची ही पहिलीच ट्रीप असल्यानं दोघंही प्रचंड उत्साहात आहेत. या ट्रीपचे फोटो देबिनानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिनं इन्स्टाग्रावर एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याच सुरुवात केली आहे.
नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देबिना
त्याचं झालं असं की, देबिनानं ड्रिंक करतानाचा ग्लासचा फोटो , व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. हे पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. एका युझरनं तिला थेट मेसेज केला. ‘ तू नुकतीच आई झालीस, इतक्याच दारु पिणं केलंस का? असा प्रश्न एका युझरनं तिला विचारलाय.
ज

काय म्हणाली देबिना?
ड्रिंक करातानाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर देबिनाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. या नंतर तिनं ट्रोल करणाऱ्या एका युझरला उत्तरही दिलं आहे. ‘नाही. हे पाणीच आहे. छान प्रेजेंट केलंय फक्त असं देबिनानं उत्तर देताना म्हटलं आहे.