मुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी नुकतीच वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारऱ्या अशोक मामांचा चाहता वर्ग देखील तितकाच मोठा आहे. घरातील सर्वांचेच ते लाडके अभिनेते असतात. आजी-आजोबा, आई-बाबा आणि आता तरुणांमध्येही अशोक सराफ यांची क्रेझ आहे. आजही त्यांचे सिनेमे ओटीटीवर पुन्हा पुन्हा पाहणारा तरुणवर्ग मोठा आहे

सोशल मीडियावर व्हायरल मीम्समुळं नव्य पिढीला देखील अशोकमामा जवळचे वाटतात.अशोक सराफ यांच्या गाजलेल्या जुन्या चित्रपटांमधील सीन मीम्ससाठी वापरण्यात येत आहेत. त्याचे हे मीम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. त्यामुळं अशोक मामा नेटकऱ्यांमध्येही तितकेच लोकप्रिय आहेत.
अशोक सराफ यांना अशी वागणूक का? ‘चला हवा येऊ द्या’वर प्रेक्षक भडकले
अशाच एका मीम्स बनणाऱ्याला नेटकऱ्याची खुद्द अशोक मामांशी भेट झाली, ते देखील त्यांच्या घरी. त्या मीमरनं हा अनुभव त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. इतक्या दिग्गज अभिनेत्यानं एका मीमरला घरी भेटायला बोलावणं ही काही साधी गोष्ट नाही.

काय लिहिलंय त्यानं पोस्टमध्ये?
कोणत्याही सेलिब्रिटीला भेटायचं म्हणजे मनावर थोडं दडपण येतंच आणि त्यात ते सेलिब्रिटी अशोक मामा आणि निवेदिता मॅडम असतील तर काही विचारू नका. सुरुवातीला थोडी धाकधूक होती पण त्यांच्याशी बोलायला लागल्यावर सगळी भीती एका क्षणात पळून गेली आणि सुमारे दोन तास त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने गप्पा मारता आल्या. मी मागे एकदा म्हटलं होतं की मराठी कलाकारांचा साधेपणा प्रत्येक मराठी माणसाला आपलंसं करतो. आज पुन्हा एकदा तोच अनुभव आला. आपण स्वतः कुणी मोठे असल्याचा भाव अजिबात न बाळगता त्यांनी आमच्याशी अगदी आपुलकीने गप्पा मारल्या. अशोक मामा आणि निवेदिता ताईंनी तर आमचे आधीचे मीम्स सुद्धा आवर्जून पाहिले आणि अशोक मामांनी ह्युमर कसा असावा, विनोद करताना त्यात विरोधाभास असणं किती महत्वाचं आहे ह्याबाबत खूप छान मार्गदर्शन केलं. आमच्या मीमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडूनच हे सगळं शिकायला मिळणं हे आमच्यासाठी खूपच फायद्याचं होतं.


अशोक सराफ म्हणाले, ‘सैराट’मध्ये तसं नावीन्य नव्हतं, पण…
गेल्या काही महिन्यांपूर्वी मराठी कलाकारांनी मीम्स बनवणाऱ्यांवर टीका केली होती. त्यानंतर आता अशोक सराफ यांनी मात्र त्यांचं प्रचंड कौतुक केलंय.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखीत अशोक सराफ मीम्सवरही व्यक्त झाले. सोशल मीडियावरील मिम्सबाबत ते म्हणाले, ‘माझ्या चित्रपटांतले संवाद, गाणी याचे मिम्स बनवून पसरवले जातात, ते पाहून, करणाऱ्यांना हे सुचतं कसं, याचं आश्चर्य वाटतं. किती सुंदर एडिट करतात ते. खरंच कौतुकास्पद आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here