चंद्रपुरातील शेतकऱ्याला महावितरणनं भलंमोठं बिल पाठवलं आहे. शेतकऱ्याच्या घरात साधा पंखा, टीव्हीदेखील नाही. झोपडीत केवळ दोन बल्ब आहेत. बल्ब दिवसभर बंद असतात. मात्र तरीही महावितरणनं शेतकऱ्याला १ लाख ३८० रुपयांचं बिल पाठवलं आहे

बिलाची रक्कम पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्यानं तातडीनं महावितरणाचं कार्यालय गाठलं. त्यानं अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. अधिकाऱ्यानं विजेचं बिल कमी करत त्याला ४४ हजार २९० रुपये भरण्यास सांगितलं. मात्र इतकं बिल कसं काय आलं, इतक्या विजेचा वापर कसा काय झाला, याबद्दल शेतकऱ्यानं विचारणा केली. मात्र त्याचं उत्तर शेतकऱ्याला मिळालं नाही.
आपण केवळ २० युनिट इतकीच वीज वापरल्याचा दावा शेतकऱ्यानं केला. त्यामुळे १ लाख ३८० रुपये कसं काय आलं असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. मात्र यावर महावितरणचे अधिकारी बोलायला तयार नाहीत. काकांकडे फ्रिज, पंखा किंना कोणतीही इलेक्ट्रिक वस्तू नाही. मग तरीही त्यांना इतकं बिल कसं काय आलं, असा प्रश्न शेतकऱ्याचा पुतण्या कंतू कोटनाके यांना पडला आहे. शेतकऱ्याच्या घरात केवळ दोन बल्ब आहेत. मात्र तरीही भरमसाठ बिल आलं आहे. ते कसं भरायचं या चिंतेत शेतकरी आहे.
महावितरणनं शेतकऱ्याला अंदाजे बिल पाठवलं आहे. महावितरणाचा कर्मचारी शेतकऱ्याच्या झोपडीत मीटर रिडिंग घेण्यास आला नव्हता. शेतकरी वास्तव्यास असलेल्या परिसरात अनेकांना ४० ते ५० हजारांचं वीज बिल आलं आहे. त्यामुळे अनेक जण त्रस्त आहेत. मात्र याची कोणतीच दखल महावितरणानं घेतलेली नाही.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : only 2 bulbs in the hut but chandrapur farmer gets electricity bill of rs 1 lakh
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network