उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास अमरावती येथील श्याम चौक परिसरातील घराजवळ चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नूपुर शर्माला पाठिंबा देणारी सोशल मीडिया पोस्ट आणि केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संबंध असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. मात्र, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने ते आधी उघड करण्यात आले नव्हते, असे पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी सांगितले होते.
मुख्य आरोपी इरफानलाही अटक
उमेश कोल्हे खून प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान खान (३२) याला अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी नागपुरातून अटक केली. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट इरफान खानने रचल्याचं पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितलं होतं. यामध्ये इतर लोकांचाही समावेश होता.
हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल
प्रकरणाचा तपास NIA कडे…
या प्रकरणात, नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टमुळे केमिस्टची हत्या झाल्याचं लक्षात घेऊन NIA तपास केंद्राने हा निर्णय घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश यांचे अमरावती शहरात औषधांचे दुकान आहे. तिने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली. उमेशने ही पोस्ट चुकून एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली होती ज्यामध्ये इतर समुदायाचे सदस्यही होते.
‘या’ आरोपींना अटक…
अटक करण्यात आलेल्या सात आरोपींमध्ये मुदस्सर अहमद (२२), शाहरुख पठाण (२५), अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२), अतीब रशीद (२२) आणि डॉ. युसूफ खान बहादूर खान (४४) आणि शेख यांचा समावेश आहे. कटकार इरफान शेख रहिम आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी शमीम अहमद याचाही पोलीस शोध घेत आहेत.