हा ट्रक सुरक्षितपणे क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम चालू आहे. पावसाळ्यात या घाटातून प्रवास करताना जरा जपून व आवश्यक ती काळजी घेऊन प्रवास करणे आवश्यक आहे. त्यामुळे रत्नागिरी व सातारा प्रशासनाकडून या घाटात फिरते वॉच ठेऊन त्याची माहिती व मदत करणारे पथक तैनात ठेवणे आवश्यक आहे. हा घाट कोकणात रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हयात पाटण हद्दीवर आहे. देशावरून कोकणात येणारी औद्योगिक वाहतुक, दुध, भाजीपाला अशा वस्तूसांठी एक महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे येथील दरडींच्या धोकादायक ठिकाणी प्राशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे.
मुंबईसह कोकणात देखील रविवार रात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. कोकण विभागात शनिवारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही सोमवारपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्हयात दक्षिण रत्नागिरी येथील लांजा राजापूर येथे तर उत्तर रत्नागिरीतील दापोली, खेड, गुहागर येथे मंगळवारी दिवसभर झालेल्या तूफान पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरले होते तर दापोली व खेड येथे दोन ठिकाणी घरांवर दरड, भिंत कोसळल्याच्या घटना घडल्याने नगरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.