रणवीरची आजी ‘चांद बर्क’ एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. चित्रपट ‘बूट पॉलिश’मध्ये राज कपूर यांनी त्यांना पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती. ‘चांद बर्क’ यांचा जन्म पाकिस्तानातील एका ख्रिश्नन कुटुंबात झाला होता. त्या मिळून एकूण १२ बहिण- भाऊ होते. त्यात चांद या शेंडफळ म्हणजेच सर्वात लहान होत्या.
चांद यांचा देखील चाहतावर्ग मोठा होता. त्यांच्या डान्समुळं त्यांना खरी ओळख मिळाली होती.’डांसिंग लिली ऑफ पंजाब’ असंही म्हटलं जायचं. अभ्यास, डान्स, अभिनय या सर्वच गोष्टीत त्यांना रस होता. वर्ष १९४६मध्ये पंजाबी सिनेसृष्टीत त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात केल्याचं म्हटलं जातं.

रणवीरच्या कामाबद्दल बोलायचं तर, नुकत्याच प्रदर्शित झालेला त्या ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नव्हता. तसंच बीग बजेट ८३ हा चित्रपटानंही अपेक्षेप्रमाणे कमाई केली नव्हती.