MNS leader Amit Thackeray meets Nitesh Rane | यानिमित्ताने भाजप आणि मनसेतील जवळीक वाढत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र लढण्याची शक्यता आहे. भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

हायलाइट्स:
- कणकवली येथील राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी ही भेट झाली
- नितेश राणे यांनी अमित ठाकरे यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
- दोघेजण सध्याच्या राजकारणावर एकमेकांशी काही बोलले का, याचा तपशील कळू शकलेला नाही
मात्र, यानिमित्ताने भाजप आणि मनसेतील जवळीक वाढत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र लढण्याची शक्यता आहे. भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. परंतु, राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने ते सध्या सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे सध्या अमित ठाकरे हे सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
शिंदे गटातील आमदार राज ठाकरेंच्या भेटीला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत मानले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी धक्का देत शिंदे गटात उडी घेतली होती. त्यानंतर सदा सरवणकर चक्क मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने चर्चेला उधाण आलं आहे. सरवणकर यांनी राज ठाकरेंचे निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर जाऊन भेट घेतली. शिंदे गटाचे दूत म्हणून सरवणकर राज ठाकरेंच्या भेटीला गेले का, असाही सवाल विचारला जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मनसेच्या आमदारालाही मंत्रीपद?
गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात अशीच एक नवी थिअरी चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) एकमेव आमदार राजू पाटील यांना स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. यामागे ठाणे जिल्हा आणि महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनातील आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी जाहिररित्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानले होते. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेच्या राजू पाटील यांनी भाजपच्या बाजूने मत दिले होते. त्यामुळे आता भाजपच्या कोट्यातून आमदार राजू पाटील (Raju Patil) यांना मंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : mns chief raj thackeray son amit thackeray meet bjp narayan rane son nitesh rane
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network