मध्यप्रदेशमधून महाराष्ट्राकडे येत असलेला गुटखा मुंबई आग्रा महामार्गावरून येत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फड यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शिरपूर शहर पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर आपले शोध पथक तैनात करून येणाऱ्या सर्व गाड्यांवर लक्ष ठेवून होते. याचवेळी एमएच १८ बीजी ८६४७ या वाहनावर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी वाहन बाजूला घेण्यास चालकाला सांगितले चालकाने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो पोलिसांच्या जाळ्यात फसला.
पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवा उडवीचे उत्तर देऊ लागला वाहनात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात डीवायएसपी अनिल माने यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात भेट देऊन अधिकांऱ्यांकडून अधिक माहिती जाणून घेतली.
या घटनेची कारवाई करत असताना शिरपूर पोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात माहिती देऊन अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक किशोर बाविस्कर यांना शिरपूर पोलीस ठाण्यात बोलावून घेत ताब्यात घेण्यात आलेला गुटख्याची रक्कम निश्चित केली. या संपूर्ण कारवाई मध्ये पोलिसांनी वाहनासह १९ लाख रुपयांचा गुटखा आणि दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पुढील कारवाई करत आहेत.