Vidhan Parishad Election 2022 | विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारकडून मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे अनेक आमदार गैरहजर होते. मतदान प्रक्रिया सुरु झाल्यावर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. काँग्रेसचे नेते याठिकाणी उशीरा पोहोचल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करताना महाविकास आघाडीची केवळ ९९ मतं नोंदवली गेली होती. इतक्या महत्त्वाच्या क्षणीही काँग्रेसचे प्रमुख नेते निष्काळजीपणे वागल्याने अनेकांनी संशय व्यक्त केला होता.

 

Prithviraj Chavan Sonia Gandhi (2)

हायलाइट्स:

  • वरकरणी काँग्रेसची तीन मतं फुटल्याचे दिसत आहे
  • काँग्रेसची प्रत्यक्षात ७ मते फुटल्याचे समोर आले आहे
  • क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ७ आमदारांवर पक्षाने कठोर कारवाई करावी
मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३९ आमदार फोडून उद्धव ठाकरे यांना धक्का दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेना अक्षरश: खिळखिळी झाली होती. यामुळे झालेला राजकीय धुरळा खाली न बसतो तोच आता काँग्रेस पक्षात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या (Congress) ७ आमदारांनी गुप्तपणे क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती पुढे आली आहे. या ७ आमदारांवर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे एक-एक गौप्यस्फोट करू लागले; फडणवीसांनी हात जोडले, म्हणाले, सगळं उघड करू नका
पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हा सारा तपशील त्यांच्यापुढे मांडल्याचे समजते. विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. चंद्रकांत हंडोरे यांना महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या आमदारांनीही मतदान केले होते. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत वरकरणी काँग्रेसची तीन मतं फुटल्याचे दिसत असले तरी काँग्रेसची प्रत्यक्षात ७ मते फुटल्याचे समोर आले होते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ७ आमदारांवर पक्षाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यामुळे आता एच.के. पाटील दिल्लीत जाऊन हायकमांडकडे काय अहवाल देणार आणि त्यानंतर सोनिया गांधी कठोर पाऊल उचलणार का, हे पाहावे लागेल.
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘अदृश्य’मदत; उपमुख्यमंत्र्यांनी मानले आभार
विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारकडून मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे अनेक आमदार गैरहजर होते. मतदान प्रक्रिया सुरु झाल्यावर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. काँग्रेसचे नेते याठिकाणी उशीरा पोहोचल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करताना महाविकास आघाडीची केवळ ९९ मतं नोंदवली गेली होती. इतक्या महत्त्वाच्या क्षणीही काँग्रेसचे प्रमुख नेते निष्काळजीपणे वागल्याने अनेकांनी संशय व्यक्त केला होता. विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहणाऱ्या नेत्यांमध्ये अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारला मदत करणाऱ्या ‘अदृश्य हातांचे’ आभार मानले होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे नोंदवले आहे. त्यामुळे आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी या सगळ्याची दखल घेतात का, हे पाहावे लागेल.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : congress leader prithviraj chavan demands to take action against congress mla’s who cross voting in vidhan parishad election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here