Shahaji Bapu Patil | मी पराभूत उमेदवार होतो तेव्हा शरद पवार यांनी मला पहाटे पाचला भेटीची वेळ दिली होती. त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले होते. राजकारणात एका बाजूला व्यक्तिगत काम महत्त्वाचे असते. तर दुसऱ्या बाजूला पक्षाच्या नेत्याने ‘शाबास रे पठ्ठ्या’ म्हणत पाठीवर दिलेली शाबासकीची थाप बरेच काम करून जाते, असेही शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

हायलाइट्स:
- या सगळ्याची बीजं फार पूर्वी पेरली गेली होती
- शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा संजय राऊत यांच्या भावाला घेण्यात आले नाही
- शपथविधीच्या यादीत आपल्या भावाचे नाव नाही हे समजल्यानंतर संजय राऊत हे तरातरा निघून गेले
यावेळी शहाजीबापू पाटील यांनी आपल्या आक्रमक शैलीत उद्धव ठाकरे यांच्याभोवती कोंडाळे करुन असणाऱ्या नेत्यांचा समाचार घेतला. पहिला नेता म्हणजे संजय राऊत, त्यानंतर अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत आणि अरविंद सावंत. हे कोंडाळं उद्धव ठाकरे यांना काहीच उमजून देत नव्हतं. कोणत्याही कार्यक्रमाला याच नेत्यांच्या कोंडाळ्यातून उद्धव ठाकरे येत असत, कार्यक्रम संपल्यावर त्यांच्याच कोंडाळ्यातून ते परत जात असत. आम्ही बाजूलाच राहायचो, अशी खंत शहाजीबापू पाटील यांनी बोलून दाखवली.
मी पराभूत उमेदवार होतो तेव्हा शरद पवार यांनी मला पहाटे पाचला भेटीची वेळ दिली होती. त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले होते. राजकारणात एका बाजूला व्यक्तिगत काम महत्त्वाचे असते. तर दुसऱ्या बाजूला पक्षाच्या नेत्याने ‘शाबास रे पठ्ठ्या’ म्हणत पाठीवर दिलेली शाबासकीची थाप बरेच काम करून जाते, असेही शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.
‘त्यादिवशी या सगळ्याची बीजं पेरली गेली’
या मुलाखतीत शहाजीबापू पाटील यांनी एक किस्सा सांगितला. या सगळ्याची बीजं फार पूर्वी पेरली गेली होती. ज्यादिवशी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा संजय राऊत यांच्या भावाला घेण्यात आले नाही. तेव्हा सुनील राऊत माझ्या बाजूला बसले होते. कोणीतरी माझी त्यांच्याशी ओळख करुन दिली, त्यानंतर मी त्यांना नमस्कार केला. शपथविधीच्या यादीत आपल्या भावाचे नाव नाही हे समजल्यानंतर संजय राऊत हे तरातरा निघून गेले, असे शहाजीबापू यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : eknath shinde camp mla shahaji bapu patil slams uddhav thackeray shivsena sanjay raut
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network