शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्या केसबाबतचा माझा लढा सुरूच राहणार असून संजय राठोड यांच्या क्लीन चिटबाबत पुणे पोलीस आयुक्तांना विचारा, अशी भूमिका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मांडली आहे.

 

maharashtra political crisis BJP leader Chitra Wagh comment on Shiv Sena leader Sanjay Rathore
भाजपसोबत आल्यानंतर संजय राठोडांवरील ‘त्या’ आरोपांचं काय ? चित्रा वाघ म्हणाल्या…

हायलाइट्स:

  • शिवसेनेचे संजय राठोड यांच्या केसबाबतचा माझा लढा सुरूच राहणार
  • भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची स्पष्ट भूमिका
  • लोणी काळभोर येथे प्रसार माध्यमांशी चित्रा वाघ यांनी संवाद साधला
पुणे : जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे एक मुलीचा खून झाला होता. या घटनेची माहिती घेण्यासाठी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ त्याठिकाणी आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांची भेट घेऊन सर्व प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांना शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्या आरोपांबाबत प्रश्न केला गेला. तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्या केसबाबतचा माझा लढा सुरूच राहणार असून संजय राठोड यांच्या क्लीन चिटबाबत पुणे पोलीस आयुक्तांना विचारा’, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी यावेळी मांडली आहे. राज्यात नव्याने भाजप आणि शिवसेनेचे सरकार आले आहे. त्यानंतरही आपण या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

त्यानंतर चित्रा वाघ म्हणाल्या की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. या क्लीन चिटबाबत तुम्ही पुणे पोलिस आयुक्तांना जाऊन प्रश्न विचारा. मी माझी लढाई अजूनही लढत आहे. हे प्रकरण कोर्टात दाखल झालं आहे. तसेच पुणे पोलिसांनी कोणत्या आधारे संजय राठोड यांना क्लीन चिट दिली. याबाबत मला माहिती नसून त्याबद्दल पोलिसांना कोर्टात सांगावे लागणार आहे. त्याच बरोबर आता युतीमध्ये आल्यावर, मी काही केस मागे घेतलेली नाही. माझा हा लढा चालूच राहणार आहे. अशी भूमिका वाघ यांनी यावेळी बोलताना मांडली.

उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू न देणारे ‘ते’ पाच नेते कोण? शहाजीबापूंनी थेट नावंच सांगितली
याशिवाय माजी आमदार रघुनाथ कुचिक यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आपण शांत बसणार नसल्याचंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवारी) दुपारी चित्रा वाघ यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. २४ तास उलटूनही या प्रकरणात धागदोरे हाती न लागल्याने स्थानिक पोलिसांच्या तपासावर देखील त्यांनी यावेळी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट ‘या’ तारखेपर्यंत बंद

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra political crisis bjp leader chitra wagh comment on shiv sena leader sanjay rathore
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here