MLA Shahaji Bapu Patil | निवडणूक हरल्यानंतर मी आबासाहेबांना भेटायचो. ते माझ्या पाठीवर थाप मारायचे, पुढे चालायचं आहे, असे सांगायचे. निराश होऊ नका, असे म्हणायचे. त्यांनी भेटून मी घरी निघायचो. मला घरी जाताना काही वाईट वाटायचं नाही. पोरं थोडीफार रडायची. पण मला गाव जवळं आलं की भीती वाटायची. घरी गेल्यावर बायकोचा रडणं आणि ओरडण्याचा सामना कसा करायचा, हा प्रश्न मला पडायचा.

 

हायलाइट्स:

  • शहाजीबापू पाटील हे गणपतराव देशमुख यांच्याविरुद्ध लढताना पाचवेळा हरले होते
  • निवडणुकीच्या दिवशी तर अगदी झुंजीचे वातावरण असायचे
  • १९९० पासून मी सलग सात निवडणुका लढवल्या
मुंबई: मी गणपतराव देशमुख यांच्याविरुद्ध सातवेळा निवडणूक लढवली. यापैकी पाचवेळा हरलो. त्यावेळी मला निवडणूक हरल्यावर वाईट वाटायचं नाही पण घरी गेल्यावर बायको ओरडेल याची भीती वाटायची, अशी प्रांजळ कबुली एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी दिली. १९९० पासून मी सलग सात निवडणुका लढवल्या. गणपतराव देशमुख आणि मी सहा महिने निवडणुकीची तयारी करायचो. सर्व निवडणुका या अटीतटीच्या व्हायच्या. निवडणुकीच्या दिवशी तर अगदी झुंजीचे वातावरण असायचे. पण या काळात कधीही एकही पोलीस केस व्हायची नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. ते बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (MLA Shahaji Bapu Patil interview)

शहाजीबापू पाटील हे गणपतराव देशमुख यांच्याविरुद्ध लढताना पाचवेळा हरले होते. त्यावेळच्या आठवणी शहाजीबापू पाटील यांनी मुलाखतीदरम्यान सांगितल्या. निवडणूक हरल्यानंतर मी आबासाहेबांना भेटायचो. ते माझ्या पाठीवर थाप मारायचे, पुढे चालायचं आहे, असे सांगायचे. निराश होऊ नका, असे म्हणायचे. त्यांनी भेटून मी घरी निघायचो. मला घरी जाताना काही वाईट वाटायचं नाही. पोरं थोडीफार रडायची. पण मला गाव जवळं आलं की भीती वाटायची. घरी गेल्यावर बायकोचा रडणं आणि ओरडण्याचा सामना कसा करायचा, हा प्रश्न मला पडायचा. मी घरात पाऊल ठेवल्याबरोबर माझी बायको बोलायचा सुरुवात करायची. याला उभं राहायला कोणी सांगितलं. सारखं उभं राहतंय, पडतंय, आमचं अपमान करतंय, अशी माझी बायको म्हणायची. त्यावर तिला मी पुढच्यावेळी निवडून येईल, हे समजावून कसं सांगायचं, हा प्रश्न मला पडायचा, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
“माझ्या मध्यस्थीने एकनाथ शिंदे आमदार, आयुष्यातलं मोठ्ठं पाप, आता पश्चाताप होतोय”
उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू न देणारे ‘ते’ पाच नेते कोण?

शहाजीबापू पाटील यांनी आपल्या आक्रमक शैलीत उद्धव ठाकरे यांच्याभोवती कोंडाळे करुन असणाऱ्या नेत्यांचा समाचार घेतला. पहिला नेता म्हणजे संजय राऊत, त्यानंतर अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत आणि अरविंद सावंत. हे कोंडाळं उद्धव ठाकरे यांना काहीच उमजून देत नव्हतं. कोणत्याही कार्यक्रमाला याच नेत्यांच्या कोंडाळ्यातून उद्धव ठाकरे येत असत, कार्यक्रम संपल्यावर त्यांच्याच कोंडाळ्यातून ते परत जात असत. आम्ही बाजूलाच राहायचो, अशी खंत शहाजीबापू पाटील यांनी बोलून दाखवली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : i am afraid of wife scolding after lost assembly elections 5 times says eknath shinde camp mla shahaji bapu patil
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here