मुंबईः सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात १४ वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वारकरी हरी नामाच्या गजरात दंग, मागून भरधाव टेम्पो वारीत घुसला, १६ गंभीर जखमी
या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.

या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. आषाढी वारी अगदी २-३ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे यंदाच्या वारीला गालबोट लागलं होतं.

वाचाः उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका, आनंदराव अडसूळांचा नेतेपदाचा राजीनामा

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील वारकरऱ्यांची पायी दिंडी ही पंढरपूरला निघाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी येथे ही वारी पोहोचली असता, मागून आलेल्या भरधाव पीकअप जीप गाडीने आधी दिंडीत असणाऱ्या छोटा हत्ती या टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यानंतर गाडी पायी निघाललेल्या दिंडीमध्ये घुसून पलटी झाली.

वाचाः शिवसेनेला आणखी एक धक्का; जिल्हाप्रमुख आनंद पवार हे शिंदें गटात सामील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here