Mumbai Goa Highway Status Today : राज्यभर सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे याचा मोठा फटका वाहतुकीला बसला आहे. अशात कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाचा यासंबंधी संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स…

 

mumbai goa highway traffic today news in marathi
रत्नागिरी : राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आधीच वाहनांचा वेग कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती हाती येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाट बंद असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. सततच्या पावसामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.

Konkan Rains Update: मुंबई-गोवा हायवेवरील परशुराम घाट बंद; कोकण-गोव्यात जाण्यासाठी जाणून घ्या पर्यायी मार्ग
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने नऊ जुलैपर्यंत परशुराम घाट बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना मोठा वळसा घालून जावं लागत आहे. यामुळे हावेवरदेखील अवजड वाहनांच्या कित्येक किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या आहे. हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक चिरणी आंबडस मार्गे सुरू असून परशुराम घाट बंद असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mumbai goa highway traffic today news in marathi traffic jam in mumbai goa highway
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here