रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाट जीवघेणा ठरण्याचा मोठा धोका लक्षात घेऊन या घाटातील वाहतूक ९ जुलै रोजी शनिवारी मध्यरात्रीपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. केवळ हलक्या प्रवासी वाहनांसाठी या घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या लोटे चिरणी आंबडस मार्गे वाहतूक सुरु आहे. पण अवजड वाहनांसाठी हा पर्यायी मार्गही बंद असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बसेसलाही या मार्गावरून बंदी घालण्यात आली आहे.

अवजड वाहनांच्या कित्येक किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. यामुळे चिरणी मार्गे अवजड वाहनांची वाहतूक होणार नसल्याने या मलवाहू वाहने कंटेनर यांच्या कित्येक किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत तर एसटी व खाजगी बसेसलाहीया पर्यायी मार्गावरून प्रवेश नाही. त्यामुळे मुंबईहुन चिपळूण, रत्नागिरीकडे येणाऱ्या एसटी बसेस तसेच दापोली खेड, मंडणगडवरून चिपळूण, रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बसेसही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

‘मुख्यमंत्रीसाहेब, राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी हाच एक पर्याय’
चिपळूण उपविभागीय अधिकाऱ्यांकडुन बुधवारी काढण्यात आलेल्या आदेशात अवजड वाहनांनी या मार्गावरून प्रवास करू नये असं स्पष्ट करण्यात आलं नसलं तरी पर्यायी असलेल्या चिरणी आंबडस मार्गे केवळ हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यायी मार्ग हा अवजड वाहनांसाठी काही तीव्र असलेल्या उतारामुळे फारसा योग्य नाही. त्यामुळे अवजड वाहने या मार्गे न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परशुराम घाट बंद असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोठा सध्या मोठा फटका बसला असून एसटी व खाजगी प्रवासी बसेसही बंद असल्याने सामान्य प्रवसी वर्गालाही मोठा फटका बसला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे व हायवेवरील बंद असलेल्या घाटामुळे आवश्यक असेल तरच प्रवास करणे योग्य ठरेल अशीच एकंदर सध्याची स्थिती आहे.

नव्या सरकारमध्ये महत्त्वाची खाती भाजपकडे; खातेवाटपाचा फॉर्म्युला कसा असेल?

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here