Shivsena TMC 66 corporators | ठाण्यातील ६६ नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Eknath Shinde Uddhav Thakceray master image (1)
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • आजपर्यंत शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे हेच ठाणे जिल्ह्यातील कारभार एकहाती सांभाळत होते
  • ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे
  • या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे
ठाणे: एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेतील ६६ नगरसेवक फोडून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आणखी एक जबर झटका दिला आहे. ठाणे महानगरपालिकेत २०१७ साली शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यापैकी फक्त एक नगरसेवक सोडून उर्वरित ६६ नगरसेवक आपल्या बाजूने वळवले आहेत. त्यामुळे आता ठाणे महानगरपालिकेतील (Thane Mahanagarpalika) शिवसेनेचा हा एकमेव कट्टर शिवसैनिक कोण आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. हा कडवा निष्ठावंत कोण आहे, याची माहिती आता समोर आली आहे. शिवसेनेच्या बाजूने ठामपणे उभ्या राहणाऱ्या या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या आहेत. नंदिनी विचारे यांच्या रुपाने आता ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक उरला आहे. नंदिनी विचारे या ठाणे महानगरपालिकेतील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. २०१७ मध्ये नंदिनी विचारे महापौरपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक होत्या.
Thane Mahanagarpalika : ठाण्यात शिवसेनेला मोठ्ठं खिंडार; पालिकेतील ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात
कालच शिवसेनेने लोकसभेतील प्रतोद पदावरून भावना गवळी यांची उचलबांगडी केली होती. त्यानंतर मुख्य प्रतोद पद हे राजन विचारे यांना देण्यात आले होते. त्यामुळेच की काय उर्वरित ६६ नगरसेवकांनी शिवसेनेची साथ सोडली असताना नंदिनी विचारे या शिवसेनेसोबत असल्याची चर्चा रंगली आहे. ठाण्यातील ६६ नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हे ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने ठाण्यातील शिवसेनेचे अस्तित्त्व पूर्णपणे पुसले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला आता ठाण्यात शुन्यातून संघटना उभारावी लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. ठाणे महापालिकेवर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता राहिली आहे. मात्र, महापालिकेच्या इतिहासात २०१७ मध्ये प्रथमच शिवसेनेला बहुमताचा आकडा गाठता आला होता. ठाणे महागनरपालिकेतील ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या गोटातून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कार्यालयात; केबिनमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो
आजपर्यंत शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे हेच ठाणे जिल्ह्यातील कारभार एकहाती सांभाळत होते. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारल्यापासूनच ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतील एक मोठा गट फुटेल, अशी अटकळ राजकीय जाणकारांकडून बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे. थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात गेल्याने आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : thane mahanagarpalika 66 corporators join eknath shinde camp mp rajan vichare wife nandini vicahre remain with shivsena
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here