ठाणे : राज्यात दोन आठवड्यांत घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे यांनी आज मंत्रालयातील आपल्या कार्यालयात जात मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. एक रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा प्रवास शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना समर्थन आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आज ठाण्यातील रिक्षाचालकांनी एकत्रित येऊन महापालिका मुख्यालय येथे जमून घोषणाबाजी केली. तसंच संपूर्ण शहरात रॅली काढली.

‘एकनाथ शिंदे आगे बढो…धर्मवीर आनंद दिघे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,’ अशी घोषणाबाजी यावेळी रिक्षाचालकांनी केली. या रॅलीवेळी रिक्षाचालकांनी ‘मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री’ असं वाक्य लिहलेले टीशर्ट देखील परिधान केले होते. तसेच होय, आम्हाला आभिमन आहे, आमचा रिक्षावाला मुख्यमंत्री झाला असा फलक देखील यावेळी पालिका मुख्यालयासमोर लावण्यात आला होता.

Shahaji Bapu Patil : ‘काय झाडी…’ डायलॉगने चर्चेत आलेले शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले, बघा काय घडलं

रिक्षावाला म्हणल्याने निर्माण झाला वाद आणि शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर

शिवसेनतून बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांकडून टीकास्त्र सोडलं जात आहे. विधिमंडळातील भाषणानंतर शिंदे यांच्यावर निशाणा साधताना ‘रिक्षावाला सुसाट सुटला’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खिल्लीही उडवली होती. शिवसेनेकडून होणाऱ्या या टीकेला स्वत: एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थकही उत्तर देत आहेत.

Uddhav Thackeray: ‘एका अटीवरच आम्ही उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर जाऊ’; बंडखोर आमदाराचं वक्तव्य

एकीकडे, ठाण्यात रिक्षाचालक रॅली काढत असताना दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘रिक्षाचालकांसाठी एसटी आगाराच्या परिसरात तात्पुरता का होईना, काही निवारा करता येईल का, यासाठी एखादी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तयार करणार आहेत,’ असं दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here