मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी (Sonakshi Sinha New Look) सिन्हा बऱ्याचदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कधी तिचा बॉयफ्रेंड कोण आहे यावरुन चर्चा सुरू असते तर कधी तिने साखरपुडा केल्याच्या बातम्या समोर येतात. आता तिने एक अजबच पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झालं आहे. तिची जवळची मैत्रिण हुमा कुरेशी हिने देखील सोनाक्षीच्या या फोटोवर ‘भीतीदायक’ अशी कमेंट केली आहे.

सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्रामवर विशेष सक्रिय असते. तिने अलीकडेच पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिने तिचे केस ब्लाँड केले आहे. या केसांना साजेसा असाच तिचा ड्रेसही आहे. अभिनेत्रीचा असा शायनी लूक पाहून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

हे वाचा-सुशांतसिंह राजपूत कसा बनला एम. एस धोनी? माहीलाही होतं अभिनेत्याच्या कामाचं कौतुक

इथे पाहा अभिनेत्रीचा नवा लूक


सोनाक्षीच्या पोस्टवर हुमाची कमेंट

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या या पोस्टवर अनेकांनी कौतुक करणाऱ्या कमेंट केल्या आहेत. पण लक्ष वेधून घेणार कमेंट ठरली ती अभिनेत्री हुमा कुरेशी हिची. तिने सोनाक्षीच्या पोस्टवर ‘Scary’ अर्थात ‘भीतीदायक’ अशी कमेंट केली आहे.

Huma Qureshi Comment on Sonakshi Sinha Post

सोनाक्षीचा आगामी सिनेमा

सोनाक्षीने २०१० साली सलमान खानच्या दबंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती ‘रावडी राठोड’, ‘सन ऑफ सरदार’, ‘दबंग २’, ‘मिशन मंगल’ आणि ‘हॉलिडे’ या सिनेमांमध्ये दिसली होती. शेवटचे ती अजय देवगणसह ‘भूज’ सिनेमामध्ये होती. आता अभिनेत्री Double XL सिनेमात दिसणार आहे.

हे वाचा-‘गोवा ट्रीपला २०-२५ हजार खर्च करता मग..’, सोशल मीडियावर होतंय संतोष जुवेकरचं कौतुक

झाली साखरपुड्याची चर्चा

गेल्या काही काळापासून सोनाक्षीचे नाव अभिनेता जहीर इक्बालसह जोडले जात आहे. तिने काही दिवसांपूर्वी तिच्या आयुष्याचील ‘मिस्ट्री मॅन’चा फोटो देखील शेअर केला होता. एवढंच नव्हे तर तिने साखरपुडा केल्याचेही समोर आले. मात्र अभिनेत्रीने हे वृत्त फेटाळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here