उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं असून गेले अनेक दिवस हा शिक्षक या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
स्वतः मुलीनेच या नराधम शिक्षकाविरोधात जबाब दिला व या जबाबनुसार कळंब पोलिसात या नराधम शिक्षका विरोधात पोक्सो व बलात्कार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेत कोर्टात हजर केले असता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, कळंब शहरात ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येत असतात. शिक्षकानेच हे कृत्य केल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.