नारायण मुर्तींचे जावई ऋषी सुनक यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर जॉन्सन यांच्या विरोधात राजीनाम्याची लाट सुरु झाली. आता बोरिस जॉन्सन पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यास तयार झाले आहेत.

 

Rishi Sunak Boris Johnson
ऋषी सुनक बोरिस जॉन्सन

हायलाइट्स:

  • बोरिस जॉन्सन राजीनामा देण्यास तयार
  • जॉन्सन यांच्याविरोधात ४० हून अधिक राजीनामे
  • ऋषी सुनक नारायण मुर्तींचे जावई
लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर पक्षातील ४० खासदारांनी राजीनामा दिल्यानं राजकीय दबाव वाढला होता. बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी राजीनामा दिल्यानंतर कन्झर्व्हेटिव्ह पक्षात राजीनाम्याची लाट सुरु झाली. जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील ४ कॅबिनेट, २२ मंत्री आणि २२ खासदारांचे सचिव आणि इतर ५ जणांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन पंतप्रधानपद सोडण्यास तयार आहेत. जोपर्यंत ब्रिटनच्या पतंप्रधानपदी नव्या व्यक्तीची निवड होत नाही तोपर्यंत जॉन्सन पदावर कायम राहणार आहेत. अर्थमंत्रिपदाचा राजीनामा देणारे ऋषी सुनक यांचं नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे. सुनक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास ब्रिटनचे ते भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ठरतील.

ऋषी सुनक कोण आहेत?
बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात ऋषी सुनक यांना अर्थ खात्याची जबाबदारी सोपवली होती. ऋषी सुनक २०२० पासून अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांचं वय ४२ वर्षे आहे. ब्रिटनचे माजी संरक्षण सचिव पेन्नी मॉर्डंट यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. करोना महामारीच्या काळात उद्योग आणि कामगारांसाठी दिलेल्या मदतीमुळं सुनक यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली आहे. ऋषी सुनक हे दिषी या नावानं देखील ओळखले जातात.
ITR दाखल केला पण रिटर्न मिळाला नाही? वाचा तुम्हाला काय करावे लागेल
ऋषी सुनक यांना कोणतंही व्यसन नसून करोना संसर्गाच्या काळात योग्य प्रकारे जबाबदारी हाताळली होती. सुनक यांचे कुटुंबीय पंजाबमधून इंग्लंडमध्ये स्थायिक झाले होते. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. ऋषी सुनक आणि अक्षता मुर्ती यांची भेट कॅलिफोर्नियामध्ये शिक्षण घेत असताना झाली होती. ऋषी सुनक यांना दोन मुली आहेत.
‘काली’च्या पोस्टरनंतर ‘शिवपार्वती’चा आक्षेपार्ह फोटो, मणिमेकलईची भाजप-संघावर टीका
सुनक यांच्या राजीनाम्यानं सुरुवात

ऋषी सुनक यांनी सरकार मधून बाहेर पडणे दुःखद असल्याचं म्हटलं होतं. मात्र, खूप विचार केल्यानंतर या निर्णयापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. जनता सरकारने योग्य प्रकारे आणि गांभीर्याने काम करण्याची अपेक्षा करते. हे माझे अखेरचे मंत्रिपद असेल मात्र तत्वांसाठी लढणं आवश्यक असल्याचे म्हणत सुनक यांनी राजीनामा दिला. सुनक यांच्यानंतर आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी राजीनामा दिला. यानंतर ब्रिटनमध्ये राजीनाम्याची लाट सुरु झाली.
‘१० जन्म घेऊनही त्यांच्यावरील उद्धवजींचे उपकार फिटले नसते’; बंडखोर आमदाराची गुलाबरावांवर टीका

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : rishi sunak indian origin leader son in law of narayan murthy in race for next pm of uk
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here