असाच एक धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडला आहे. यामध्ये व्हिडिओकॉलद्वारे एका महिलेने समोरच्या व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करत त्याला चक्क लाखो रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे फोन कॉल करत या व्यक्तीची मानसिक स्थिती खराब करून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न याठिकाणी सायबर क्राईम करणाऱ्या या महिलेने केला आहे. मात्र, पोलीस प्रशासनाला हा प्रकार समजल्यानंतर एक मोठा खुलासा देखील पोलीस प्रशासनाने केला आहे. तो म्हणजे बीड जिल्ह्यात जवळपास अशा शंभरहून अधिक केसेस घडल्या आहेत. मात्र, आपलं नाव खराब होऊ नये म्हणून नागरिक पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. या सर्व प्रकारामुळे सायबर क्राईम विभाग अशा बनावट फोन काॅल आणि फेसबुक, इनस्टाग्रामवर असलेल्या बनावट अकाउंट्सपासून सावध राहण्याचा इशारा देत आहेत.
तरुणाई अशा व्हिडिओंकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना पाहायला मिळते. त्यात जवळपास बीड जिल्ह्यात शंभरहून जास्त आकडा असेल तर महाराष्ट्रभर किती असेल हा देखील प्रश्न प्रशासनासमोर आहे. हे अश्लील कॉल उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, कर्नाटक अशा अनेक ठिकाणाहून येतात. मात्र, त्यांचा तपास लावणे देखील लावता येत नाहीये. या सगळ्या प्रकरणावर पोलीस प्रशासन आता तातडीने कामाला लागलं आहे. असं देखील बीड पोलिसांनी सांगितलं आहे.