या मालिकेतील आजचा पहिला सामना साऊदम्टनमध्ये होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना शनिवारी ९ जुलैला बर्मिंगहम आणि त्यानंतर तिसरा सामना हा १० जुलैला नॉटिंगहम येथे खेळवण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा पहिला सामना भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता सुरु होणार आहे. पण बाकीचे सामने मात्र संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होणार आहेत.

हायलाइट्स:
- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना आज रंगणार आहे.
- हा एकच सामना रात्री १०.३० वाजता सुरु करण्यात येणार आहे.
- हा एकच सामना का उशिरा सुरु होणार आहे, जाणून घ्या…
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन ट्वेन्टी-२० सामने होणार आहेत. या मालिकेतील आजचा पहिला सामना साऊदम्टनमध्ये होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना शनिवारी ९ जुलैला बर्मिंगहम आणि त्यानंतर तिसरा सामना हा १० जुलैला नॉटिंगहम येथे खेळवण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा पहिला सामना भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे हा सामना संपायला भारतामध्ये नक्कीच मध्यरात्र होणार आहे. इंग्लंडमधील कसोटी सामना जेव्हा खेळवला गेला तेव्हा तो अर्धा तास लवकर खेळवण्यात आला होता. साधारणपणे इंग्लंडमध्ये कसोटी सामना हा दुपारी ३.३० वाजता सुरु होतो, पण यावेळी हा सामना दुपारी ३.०० वाजता सुरु करण्यात आला होता. त्यामुळे इंग्लंडच्या ट्वेन्टी-२० सामन्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.
ट्वेन्टी-२० सामने हे मुख्यत्वेकरून दिवस-रात्र खेळवले जातात. पण भारतासाठी यामध्ये बदल करण्यात आले आहेत. या मालिकेतील फक्त एकच सामना हा दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे, तर दोन सामने दिवसा खेळवण्यात येणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना हा दिवस-रात्र असल्यामुळे तो भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० मिनिटांनी सुरु होणार आहे. पण भारतीयांसाठी हे उपयुक्त नाही. त्यामुळे या मालिकेत अन्य दोन सामने हे दिवसा खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळेच या मालिकेतील सामन्यांमध्ये वेळेचा फरक असल्याचे दिसत आहे. रोहित शर्माने आता भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्यामुळे तो भारताला इंग्लंडमधील पहिला विजय मिळवून देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network