कोकणात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे आमदार वैभव नाईक यांनी या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील अर्धवट स्थितीतील व रखडलेल्या गटार खोदाई कामाचा आढावा घेतला. मात्र, रखडलेल्या कामांमुळे स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नाईक यांनी ठेकेदाराला याबाबत प्रश्न केला असता आपल्याकडे माणसं नाहीत असं सांगितल्यावर नाईक यांनी ठेकेदाराच्या हातात असलेली फाईल काढून घेत “फाईल कसल्या फिरवतोस तोंडावर मारून फेकेन”, असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला. आमदार वैभव नाईक शिवसेना स्टाईलने आक्रमक झाले असल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत यांनीही गटार खोदाई कामाबाबत ठेकेदार आणि प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. वारंवार सांगूनही योग्य पद्धतीने काम झाले नाही. मात्र, ४ लाखापेक्षा जास्त बिल प्रशासनाकडून ठेकेदाराला देण्यात आले. याबाबत आमदार वैभव नाईक यांच्याकडे तक्रार करण्यात आली.