kolhapur water crisis, ‘पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही’, कोल्हापूरच्या लग्नाची तुफान चर्चा – kolhapur water crisis kolhapur marriage viral news man tanker took in dowry for wife
कोल्हापूर : आजपर्यंत आपण अनेक लग्नात जात असतो नवरदेव आणि वधूची घोडी, हत्ती आणि पालखीमध्ये बसून वरात निघालेली सर्वांनीच पहिली आहे. पण कधी टँकरवरून वरात निघालेली पहिली आहे का? कोल्हापुरात एक आगळी वेगळी मिरवणूक निघाली आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कोल्हापूर शहरातील पाणी समस्येवर लक्ष वेधण्यासाठी नवीन जोडप्यांनी चक्क पाण्याच्या टँकरवरून आपली वरात काढली आहे. त्यांची ही वरात संपूर्ण कोल्हापुरात चर्चेचा विषय आहे. विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंखे हे काल लग्नाच्या बंधनात विवाहबद्ध झाले. यानंतर रात्री हलगी घुमक्याच्या तालात मंगळवार पेठेतून ही वरात निघाली.
कोल्हापूर शहरात अनेक भागात नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असते. यामुळे अनेक आंदोलने झाली, निवेदनेही देऊन झाली. मात्र, प्रशासन आपल्याकडे लक्ष देत नाही. अशातच कोल्हापुरातील प्रिन्स क्लब, खासबाग मैदान परिसरात राहणाऱ्या विशाल कोळेकर आणि अर्पणा साळुंखे यांचा गुरुवारी विवाहसोहळा पार पडला आणि आपल्या बायकोला पाणी भरण्याचा त्रास नको म्हणत आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नवऱ्याने शक्कल लढवत पाण्याचे टँकर मागवले… आणि मग काय… टँकर फुलांनी सजन्याऐवजी घागरींनी सजला. न्यायालयाचा एसटी महामंडळाला धक्का; थेट एसटीबस केली जप्त वरातीमध्ये सहभागी झालेली मंडळी ही डोक्यावरून घागर हंडे घेतले आणि वधू-वर टँकरवर बसले. हल्गीच्या नादात कोल्हापुरातील महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, खासबाग येथून जोरदार वरात निघाली. ही वरात जेवढी लक्षवेधी होती तेवढीच लक्षवेधी होता या टँकरवर लावलेला बोर्ड. हा बोर्ड पाहून हसावं की रडाव अशी परिस्थिती अनेकांना पडत होती. जोपर्यंत परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही असा बॅनर टँकरच्या दोन्ही बाजूला झळकत होता.
बायकोला त्रास नको म्हणून हुंडा म्हणून टँकरच घेतला अशा प्रकारचा फलक वधूवरांच्या मागे सरकत होता. अशा प्रकारच्या या आगळ्यावेगळ्या वरातीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र, याच वरातीतून सामान्य माणसाला भीडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासन कधी लक्ष देणार हाही प्रश्न येथे उपस्थित होतो आहे.