नीतू सिंगची नीतू कपूर होणं सोपं नव्हतं, घ्यावे लागलेले कठोर निर्णय
चित्रपटांमध्ये काम करताना नीतू सिंगच्या आयुष्यात ऋषी कपूर आले. ऋषी कपूर आणि नीतू यांनी जवळपास १२ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत ऋषी यांचे वडील आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते राज कपूर यांनी लग्नानंतर कुटुंबासाठी सिनेसृष्टी सोडावी लागेल, अशी अट घातली. नीतू यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि यशस्वी करिअर सोडून त्या ऋषी यांची पत्नी म्हणून जगू लागल्या.

सासू- सासऱ्यांची आवडती सून झाल्या नीतू कपूर
नीतू सिंगपासून नीतू कपूर झालेल्या अभिनेत्रीने प्रेम मिळवण्यासाठी खूप त्याग केला. नीतू यांनी फिल्मी जगत सोडले आणि कुटुंबाला पूर्णपणे वाहून घेतले. राज कपूर आणि कृष्णा राज यांनीही त्यांना मुलीसारखे वागवले. नीतू आणि राज कपूर यांच्यातील बाँडिंग कसं होतं हे कळण्यासाठी हा एक किस्सा पुरेसा आहे, जो नीतू यांनी स्वतः सांगितला होता. नीतूने म्हणाल्या होत्या की, ‘माझी आणि ऋषी कपूर यांच्या साखरपुड्याची पार्टी सुरू होती. राज कपूर यांना ब्लॅक लेबल आवडायचं हे मला माहीत होतं. तरीही मी त्यांना विचारले की तुम्ही पेप्स, कोक किंवा इतर कोणतंही शीतपेय घेणार का? यावर राज कपूर जोरात म्हणाले की, घरात आणखी एक कृष्णा आली आहे.’