Deepak Kesarkar | आदित्य ठाकरे खूप लहान आहेत. तुम्ही गद्दार कोणाला म्हणता? तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर असा शब्द तुमच्या तोंडात येताना दहा वेळा विचार करायला हवा. आम्हीही खूप बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही. मी आदित्य साहेबांपेक्षा दुप्पट वयाचा माणुस आहे. मात्र जेव्हा आदित्य साहेब येतात तेव्हा मी उठून उभा राहातो कारण तो मान त्यांचा नव्हे तर बाळासाहेब आणि उद्धव‌ ठाकरेंचा आहे.

 

Deepak Kesarkar Aaditya Thackeray
दीपक केसरकर आणि आदित्य ठाकरे

हायलाइट्स:

  • तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर असा शब्द तुमच्या तोंडात येताना दहा वेळा विचार करायला हवा
  • तुमच्याकडे तो वारसा आला त्यामुळे तुम्हाला सुद्धा तो मान मिळाला आहे
  • आपण कसे बोलावे हे त्यांनी उद्धव साहेबांकडून शिकावे
शिर्डी: भाजपसोबत सत्तास्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांना उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांचा पुन्हा एकदा गद्दार म्हणून उल्लेख केल्याने दिपक केसरकर संतप्त झाल्याचे बघायला मिळाले. तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात. कसे बोलावे हे उद्धव साहेबांकडून शिका, राऊतांकडून शिकू नका, असा सल्ला त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.
Eknath Shinde Camp: ‘उद्धव ठाकरेंनी थेट मोदी-अमित शाहांशी बोलावं, अजूनही वेळ गेलेली नाही’; शिंदे गटाकडून समेटाचा प्रस्ताव
मंत्रिमंडळ विस्ताराआधी दीपक केसरकर हे गुरुवारी सायंकाळी शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद अनेक प्रश्नांवर सडेतोड उत्तरे दिली. गद्दार हे गद्दारच आहेत. मात्र, ज्यांना वाटते त्यांनी अजूनही परत यावे असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्यावरून दिपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. आदित्य ठाकरे खूप लहान आहेत. तुम्ही गद्दार कोणाला म्हणता? तुम्ही बाळासाहेबांचे नातू असाल तर असा शब्द तुमच्या तोंडात येताना दहा वेळा विचार करायला हवा. आम्हीही खूप बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही. मी आदित्य साहेबांपेक्षा दुप्पट वयाचा माणुस आहे. मात्र, जेव्हा आदित्य साहेब येतात तेव्हा मी उठून उभा राहातो कारण तो मान त्यांचा नव्हे तर बाळासाहेब आणि उद्धव‌ ठाकरेंचा आहे. तुमच्याकडे तो वारसा आला त्यामुळे तुम्हाला सुद्धा तो मान मिळाला आहे. आपण कसे बोलावे हे त्यांनी उद्धव साहेबांकडून शिकावे, त्यांनी ते संजय राऊतांकडून शिकू नये, असा सल्ला दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.
मोदी-शाह पुन्हा धक्कातंत्र वापरणार, माजी शिवसैनिकाला उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी?

यापुढे उद्धव ठाकरेंवर टीका होणार नाही

किरीट सोमय्या यांनी आज ट्विट करत उद्धव ठाकरेंचा उल्लेख माफिया उद्धव असे केल्याने दीपक केसरकर यांनी त्यांच्या या टिपण्णीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. किरीट सोमय्या उद्धवजींबाबत जे बोलले ते चुकीचे असल्याचे केसरकर म्हणाले. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. सर्व भाजप नेते आणि आम्ही ठरवलं होतं की, आमच्या नेत्याविषयी वाईट बोलायचे नाही. कदाचित त्या बैठकीत सोमय्या नव्हते. मात्र त्याबद्दल आम्ही ताबडतोब फडणवीसांना सांगितले आहे. ते त्याबाबत निर्णय घेतील आणि यापुढे उद्धव ठाकरेंवर टीका होणार नाही असे केसरकरांनी स्पष्ट केले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : eknath shinde camp spokeperson deepak kesarkar slams shivsena leader aaditya thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here