Shivsena Sanjay Raut | एकनाथ शिंदे यांनी पक्षातील दोन तृतीयांश आमदार फोडून शिवसेनेच्या अस्तित्त्वाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ शिवसेनेचे आमदारच फोडलेले नाहीत तर संपूर्ण पक्षच आपला असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून आगामी काळात शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणुका लढवण्याची योजना आखली आहे.

 

Sanjay Raut bow arrow (1)
संजय राऊत

हायलाइट्स:

  • न्यायालयीन लढाईत पराभव झाल्यास आपल्याला ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह सोडावे लागू शकते
  • उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना याची जाणीव
  • एकनाथ शिंदे यांनी केवळ शिवसेनेचे आमदारच फोडलेले नाहीत तर संपूर्ण पक्षच आपला असल्याचा दावा केला आहे
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संपूर्ण पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची तयारी ठेवा, असे निर्देशही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक सूचक ट्विट केले आहे. जब “खोने”के लिए कुछ भी ना बचा हो तो “पाने” के लिए बहुत कुछ होता हैं! जय महाराष्ट्र !., असे संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.न्यायालयीन लढाईत पराभव झाल्यास आपल्याला ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह सोडावे लागू शकते, याची जाणीव उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना झाली आहे का, असा प्रश्न आता या ट्विटमुळे निर्माण झाला आहे. (Shivsena leader Sanjay Raut tweet)
Eknath Shinde Camp: ‘उद्धव ठाकरेंनी थेट मोदी-अमित शाहांशी बोलावं, अजूनही वेळ गेलेली नाही’; शिंदे गटाकडून समेटाचा प्रस्ताव
एकनाथ शिंदे यांनी पक्षातील दोन तृतीयांश आमदार फोडून शिवसेनेच्या अस्तित्त्वाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ शिवसेनेचे आमदारच फोडलेले नाहीत तर संपूर्ण पक्षच आपला असल्याचा दावा केला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून आगामी काळात शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणुका लढवण्याची योजना आखली आहे. त्यासाठी न्यायालयीन लढाईत एकनाथ शिंदे गटाला भाजपकडून आवश्यक ती सर्व रसद पुरवली जाईल. त्यानंतरही हा प्रश्न निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेल्यास शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे. कारण, एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी की एकनाथ शिंदेंची सेना खरी, असा प्रश्न उद्भवल्यास निवडणूक आयोग शिवसेनेची ओळख असलेले ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच गोठवू शकते.

उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे गट येत्या काही दिवसांत प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. त्यात त्यांना यश मिळू नये यासाठी शिवसेना त्यांच्या परीने जोरदार प्रयत्न करीत आहे. मुंबई तसेच दिल्लीतील कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ यांच्याशी सातत्याने संपर्क साधत कायदेशीर डावपेचांची लढाई लढत आहे. मात्र दुर्दैवाने यात अपयश आले तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता जे काही नवे निवडणूक चिन्ह घेण्याची वेळ येईल ते स्वीकारून लवकरात लवकर ते सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल याची आधीपासूनच तयारी करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे खात्रीलायकरित्या समजते. ‘माझी प्रकृती ठिकठाक असल्याने आता दर दिवसाआड आपण शिवसेना भवनमध्ये उपलब्ध आहोत’, असे सांगत विरोधकांशी दोन हात करण्यास आपण सज्ज असल्याचे संकेतच त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shvisena may loose paty symbol bow and arrow dhanushya ban sanjay raut tweet
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here