कल्याण-डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार फोडून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर राज्यभरातून अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही शिवसेनेला शिंदेंनी झटका दिला. यानंतर आता आणखी एका विभागात सेनेला मोठं खिंडार पडलं आहे.

केडीएमसीचे ५५ पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याकडून उद्धव ठाकरेंसोबत वारंवार धक्कातंत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आता पुन्हा एका धक्का देण्यात आला आहे. कारण, केडीएमसीचे ५५ पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीमधूनही उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानावा लागेल.

Sanjay Raut: ‘धनुष्यबाण’ शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता; संजय राऊतांचं सूचक ट्विट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट
कल्याण-डोंबिवलीतील सर्व नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आपला पाठिंबा दर्शवला आहे. डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरेदेखील शिंदे गटात सामिल झाल्याची माहिती आहे. राज्यातील आमदार, खासदारांनी बंड केल्यानंतर त्याच्या पडसाद आता स्थानिक पातळीवरही पाहायला मिळत आहेत, असंच म्हणावं लागेल.

ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार
ठाणे महागनरपालिकेतील ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या गोटातून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आजपर्यंत शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे हेच ठाणे जिल्ह्यातील कारभार एकहाती सांभाळत होते. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारल्यापासूनच ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतील एक मोठा गट फुटेल, अशी अटकळ राजकीय जाणकारांकडून बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे.

ट्रकमध्ये बनवले २ कंपार्टमेंट, उघडताच फुटला घाम; लोणावळ्यात पोलिसांची मोठी कारवाई

पालिकेतील ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात
थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात गेल्याने आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३४, भाजपकडे २३, काँग्रेसकडे ३ आणि एमआयएमकडे २ नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हनिमूनला जाणार नाही’, कोल्हापूरच्या लग्नाची तुफान चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here