रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरात सायकलचे ब्रेक फेल होऊन झालेल्या विचित्र अपघाताने ह्रदयद्रावक घटना घडली आहे. दापोली शहराजवळील गिम्हवणे आझादवाडी येथील आर्यन विनोद गौरत इयत्ता दहावी सेमी इंग्लिश माध्यमातून शिकणारा दापोली शहरातील लोकमान्य हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याच्या असा काही प्रकार घडला की यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ७ जुलै रोजी तो नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेला होता. मात्र, शाळेतून सायंकाळी चार वाजता सुमारास सुटल्यावर शाळेसमोर उजवीकडे असलेल्या उतारावरून तो नेहमीप्रमाणे सायकल घेऊन घरी जाण्यासाठी निघाला होता पण याचवेळी घात झाला. सायकलचे तीव्र उतारात ब्रेक फेल झाले. यावेळी तात्काळ उपचार करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आर्यनचा मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे शाळेत सकाळी जातो काय आणि घरी येताना हा अचानक अपघात होऊन हे घडते काय. या साऱ्या निष्ठूर नियतीच्या डावाने हसता खेळता मुलगा गमावल्याने गिम्हवणे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

ठाण्यानंतर शिवसेनेला आणखी एक खिंडार, ५५ पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात
हा अपघातच इतर विद्यार्थी मित्रांनी त्याला उचलून शाळेत आणलं. शिक्षकांनी तात्काळ त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. पोटात सायकलचे हँडल घुसल्याने आर्यनच्या यकृतालाही गंभीर दुखापत झाली. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत असतानाचा आर्यनने जगाचा निरोप घेतला.

८ जुलै रोजी शुक्रवारी सकाळी आर्यनवर अंत्यसंस्कार केले गेले. त्याचा पश्चात आई, वडिल, भाऊ असे कुटूंब आहे. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ट्रकमध्ये बनवले २ कंपार्टमेंट, उघडताच फुटला घाम; लोणावळ्यात पोलिसांची मोठी कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here