जयदीप बॅनर्जी, मुंबई : चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे. भारतातील ७५ टक्क्यांहून अधिक कुटुंबांकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सोने आहे. गेल्या ५० वर्षांत सोन्याच्या खरेदीतील चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर (सीएजीआर) हा १४.५० टक्के राहिला आहे. सोने हे आजच्या जागतिक वातावरणात सर्वाधिक मागणी असलेल्या वस्तूंपैकी एक आहे.

भारतीय रत्ने आणि दागिने उद्योग जवळपास ६.५० ट्रिलीयन (सुमारे साडे लाख कोटी) रुपये आहे. या क्षेत्राचा देशाच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांत ९० ते ९५ टक्के आहे. संपूर्ण मूल्य साखळीत हे क्षेत्र प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सुमारे ६१ लाखांचा रोजगार देते. वर्षाच्या अखेरीस, या क्षेत्रातून सुमारे ९४ लाखांचा रोजगार मिळण्याचा अंदाज आहे, यातून या क्षेत्रात ३३ लाख रोजगारांची अतिरिक्त गरज असल्याचे सिद्ध होते. शिवाय, सोन्याचे ६० टक्के दागिने ग्रामीण भारतात विकले जातात. यातून त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेच्या काही समस्या सोडविणे शक्य होते. तसे असले तरी या श्रेणीतील मालमत्तांमध्ये सोन्याचे असलेले फायदे आणि पर्याय अद्यापही पूर्ण रुपात खुले करणे आवश्यक आहे.

अर्थतज्ज्ञांच्या विरुद्ध मत असूनही, गुंतवणूकदार त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्याला मालमत्ता मानतात व त्याचा वापर महागाई आणि बाजारातील अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी करतात. भारतात, मध्यम-उत्पन्न गट, किंवा वर्षाला २ ते १० लाख रुपये लाख कमावणारी कुटुंबे, श्रीमंत वर्गवारीतील लोकांपेक्षा सोन्यात अधिक गुंतवणूक करतात. इंडिया गोल्ड पॉलिसी सेंटरच्या (आयजीपीसी) सोन्यासंबंधी राष्ट्रीय देशांतर्गत सर्वेक्षणानुसार, देशातील एकूण वार्षिक ८०० ते ८५० टन सोने खरेदीपैकी मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांची खरेदी ५६ टक्के आहे. सोन्याच्या दागिन्यांवर खर्च करण्याच्या क्रमवारीत केरळ अग्रस्थानी आहे आणि त्याचा दरडोई खर्च या निर्देशांकात दुसऱ्या स्थानी असलेल्या गोव्यापेक्षा सहापट अधिक आहे. तसेच, ग्रामीण केरळमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर होणारा दरडोई खर्च हा सोन्याची सर्वाधिक खरेदी करणाऱ्या इतर सहा प्रमुख राज्यांच्या एकूण दरडोई खर्चापेक्षा खूप अधिक आहे, हे विशेष.

खरेदीची सुवर्णसंधी; सलग तिसऱ्या सत्रात सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचा दर
सोन्याच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे अनेकदा हा धातू खरेदी करणे कठीण होते. २४ कॅरेट शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याची २०२१ मध्ये ४८ हजार ७२० रुपये असलेली किंमत २०२२ मध्ये ५२ हजार ६९० रुपये झाली आहे. त्यामुळेच सोने ही ग्राहकांना सूक्ष्म बचत करण्याची संधी देणारी ही एक नियमित मालमत्ता होत आहे. यातून ग्राहक स्वत:ची तरलता स्थिती सुधारुन आकांक्षा पूर्ण करु शकतात.

तुमच्या आमदारांपेक्षा तुम्ही कसे जलदगतीनं श्रीमंत होऊ शकता, आकडेवारी पाहा
सोनं सामाजिक दर्जाचे प्रतिक आणि धोरणात्मक मालमत्ता, असे दोन्ही आहे. त्याचे भावनिक मूल्य आहे आणि धोरणात्मक मालमत्तेची भूमिकाही बजावतात. आणिबाणीच्या परिस्थितीत ते भांडवलाचे संरक्षण करण्याससह शीघ्र तरलता देतात. सर्वात अलीकडील दशक हे ग्राहकांच्या मनात सोन्याबाबत असलेल्या मूल्याचा पुरावा आहे. आर्थिक उलथापालथ आणि अस्थिरतेच्या काळात, सोन्याने गुंतवणूकदारांची मालमत्ता सुरक्षित ठेवली. भारतात, विशेषत: ग्रामीण बाजारपेठांमध्ये, ग्राहकांना म्युच्युअल फंड आणि समभाग, यासारख्या आर्थिक किंवा बचत साधनांमध्ये मर्यादित प्रवेश आहे, यामुळेच भारतात सोन्याची मागणी जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक वाढेल.

Gold : सोनं

सध्याच्या बाजारातील अस्थिरता आणि उच्च चलनवाढीपासून संरक्षणासाठी सोने सुरक्षित कुंपण (हेज) मानले जाते. एप्रिल २०२२ महागाई दर (सीपीआय) ७.५० टक्के होता. रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य व्याजदर वाढीच्या पार्श्वभूमीवर रोखे उत्पन्न कमी झाले आहे. यामुळे आता भांडवली बाजाराच्या आपण मंदीच्या टप्प्यात प्रवेश करीत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. आर्थिक बाजारातील अशा अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याकडे एक सुरक्षित पैज म्हणूनच पाहिले जात आहे. मजबूत जागतिक ट्रेंड आणि सकारात्मक गुंतवणूक भावनांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी अलिकडे सोन्याची मालमत्ता म्हणून निवड केल्याने सोन्यामध्ये लक्षणीय वाढ झाली. चीनमधील औद्योगिक उत्पादनात झालेली घट आणि प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे भारतातील सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. तसेच, ओपेक सदस्यांनी कमी मागणीचा अंदाज बांधल्यानंतरही कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सोन्याला आणखी चालना मिळाली आहे. धोरणात्मक साठ्यातून खनिज तेल व उत्पादने विक्रमी प्रमाणात बाजारात आणण्याच्या योजनेमुळे ‘ब्रेंट क्रूड’ १०० डॉलरच्या खाली घसरले. त्याचवेळी चीनमध्ये सततच्या कोरोना विषाणू लॉकडाउनमुळे, भारतीत बाजारातील अस्थिरतेवर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे.
मोठा उलटफेर; ‘टॉप-१०’ श्रीमंत उद्योजकांमध्ये अदानींचे कमबॅक तर अंबानींना फटका
संघटित सोने तारण बाजाराच्या तुलनेत, असंघटित बाजारपेठेची भारतातील उपस्थिती अधिक मजबूत आहे. सोने तारण-कर्जाच्या बाजारपेठेत ६५ टक्के वाटा असणाऱ्या असंघटित क्षेत्रामध्ये सावकार, दलाल आणि नोंदणी नसलेल्या सुवर्ण कर्ज कंपन्यांचा समावेश होतो. परंतु ही रचना आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या नाविन्यपूर्णतेने चालत असलेल्या ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त, ग्रामीण बचत, विमा आणि बँक खाती या क्षेत्रांमध्ये आर्थिक उत्पादनांना पुरविणाऱ्या नवीन-युगातील फिनटेक कंपन्यांसह झपाट्याने बदलत आहे.

उदाहरणार्थ, काही कंपन्या ग्राहकांना पारंपारिक श्रेणीशी संबंधित गैरसोयीशिवाय नेहमीच्या मालमत्ता वर्गाप्रमाणे सोन्यात सूक्ष्म बचतीची परवानगी देतात. वेगवेगळ्या रितीने आखण्यात केलेल्या सोन्याच्या सूक्ष्म-बचत योजनांद्वारे, ते ग्राहकांना त्यांच्या रोख उपलब्धतेनुसार शुद्ध सोन्याच्या ग्रॅममध्ये लहान लवचिक हप्त्यांमधून बचत करण्यासाठी सक्षम करतात. त्यांचे उत्पादन कुटुंबांना अखंडपणे आणि डिजिटल पद्धतीने आर्थिक सुरक्षा जाळे तयार करण्यात मदत करते. यामध्ये आणिबाणीच्या काळात ग्राहकांना त्यांच्या बचतीचा वापर करण्यासाठी अल्प किंवा दीर्घकालीन जीवन उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहकांना सोने सुरक्षित करण्याची व एकप्रकारे त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याची हमी मिळते.

उद्योगासाठी, सोने हे मालमत्ता वर्ग म्हणून सोन्याभोवती असलेल्या सर्वसमावेशक वित्तीय सेवा तयार करण्याची द्रष्टी अशी रोमांचक संधी असेल. ही संधी केवळ अस्थिरता किंवा महागाईपासून संरक्षण करत नाही तर भारतातील लाखो कुटुंबांच्या आकांक्षांना सक्षम बनवते.

(लेखक स्मार्टगोल्ड कंपनीचे सह-संस्थापक असून लेखातील मते वैयक्तिक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here