मुंबई: नोरा फतेही नेहमीच चर्चेत असते. तिच्या अप्रतिम डान्समुळं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. तिला डान्सिंग सेन्सेशनही म्हटलं जातं. डान्सिंगसोबतच ती एक उत्तम अभिनेत्री देखील आहे. तिनं ‘भुज-द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटात भूमिका छोटी असली तरी सुद्धा आपल्या अभिनयानं तिनं सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं होतं. असं असलं तरी सिनेसृष्टीत तिला काही वाईट अनुभव देखील आले. वेळोवेळी तिनं ते शेअर केले आहेत.

नोरानं नुकताच तिला आलेला एक अनुभव शेअर केलाय. इंडस्ट्रीत नवीन असताना, कामासाठी संघर्ष करत असताना तिला आलेला हा अनुभव आहे. निर्मात्यांची बोलणी, त्यांचे नकार हे सर्व नोरानं अनुभवलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नोरानं याबद्दल सांगितलंय.
दीदी बोलायचा आणि नंतर सेक्सची मागणी,४८ वर्षीय अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
या क्षेत्रात नवीन असताना एका महिला कास्टिंग डायरेक्टरनं तिला त्याच्या घरी ऑडिशनसाठी बोलवलं होतं. तिनं नोराला घरी बोलवलं पण, त्याबदल्यात कास्टिंग डायरेक्टरनं तिचा अपमान करत नको-नको ऐकवलं होतं.
टीव्ही अभिनेत्रीनं ठोकला अभिनयाला रामराम? शेतात काम करतानाचा Video झाला Viral
काय म्हणाली होती कास्टिंग डायरेक्टर?
इथं तुझ्यासारख्या अनेक मुली येतात. तुझ्यासारख्या मुलींमुळं इंडस्ट्री वैतागली आहे. तुमच्या सारखी माणसं आम्हाला नकोत.’ कास्टिंग डायरेक्टरचे हे शब्द ऐकूण नोरा खचली होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा तिनं हे क्षेत्र सोडून द्यायचं असाही निर्णय घेतला होता.

असा एक घडलेला प्रसंग नोरानं शेअर केला. तसंच हिंदी भाषा बोलता येत नसल्यानंही सुरुवातील तिला चिडवलं जायचं, असंही नोरा म्हणाली.

नोराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या डान्स दिवाने ज्युनिअर या शो ची परीक्षक म्हणून काम करतेय. या शोमध्ये ती तुफान धमाल करतानाही दिसतेय. नीतू सिंग आणि मर्जी पेस्तोनजी यांच्यासोबत नोराचा चिमुकल्या डान्सर्ससोबतचा दिलखुलास संवाद प्रेक्षकांना आवडतोय. लवकरच नोरा थँक्यू आणि एक विलन रिटर्न या सिनेमात दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here