| महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 8, 2022, 3:17 PM

‘देवमाणूस’ या मालिकेनं पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. दुसऱ्या पर्वातही मालिकेची चर्चा सुरू आहे. दुसरं पर्व सुरू झालं तेव्हा प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. परंतु हळुहळू मालिका जोर पकडताना दिसतेय.

 

देवमाणूस

मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ या मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेनं वाट बघत होते. त्यांच्या मागणीनुसार मालिकेचं दुसरं पर्व आलं . पण सुरुवातीला प्रेक्षकांना नाराजी व्यक्त केली होती. मालिकेत काही तरी नवीन पाहायला मिळावं अशी प्रेक्षकांनी अपेक्षा होती.

तुझ्या सारख्या खूप जणी… कास्टिंग डायरेक्टरचं बोलणं ऐकून नोराच्या डोळ्यात आलं पाणी
प्रेक्षकांची नाराजी दूर करण्यासाठी देवमाणूस मालिकेत आता ट्वीस्टवर ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मालिका आता संपणार की काय असं वाटत असतानाच आणखी एक रंजक वळण आलं आहे. मालिकेत डॉक्टर, उर्फ अजित कुमार देव उर्फ नटवर सिंग देवयानी गायकवाड हिच्या संपर्कात आला आहे. पण नेहमी दुसऱ्यांना जाळ्यात अडकणारा हा देवीसिंग आता देवयानी गायकवाडच्या जाळ्यात अडकताना दिसतोय. तर दुसरीकडं पोलिस अधिकारी मार्तंड जामकर पुरावे गोळा करत आहे.

‘देवमाणूस २’मध्ये आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री, चर्चा मात्र वेगळीच

मार्तंड जामकरला डॉ. अजित कुमार देव याच्या मुंबईतील हॉस्पिटलबद्दल माहिती मिळाल्यानंतर तो तिथं पोहोचतो. तिथं त्याला डॉ. अजित कुमारची गर्लफ्रेंड भेटते. डॉ. अजित कुमारचा मृत्यू झाल्याचं ती जामकरला सांगते.

या यानंतर जामकर देवीसिंगविरोधात आणखी काय पुरावे गोळा करणार, मालिकेत आणखी कोणता ट्वीस्ट येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : devmanus 2 marathi serial updates martand jamkar metdr ajit kumar dev’s fiancee
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here