मुंबई :नीतू कपूर (Neetu Kapoor birthday) यांचा आज वाढदिवस. नीतू त्यांचा वाढदिवस लंडनमध्ये त्यांच्या लेकीबरोबर साजरा करत आहेत. नीतू यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर होत आहे. नीतू यांची लाडकी लेक रिद्धिमा कपूर साहनी (Riddhima Kapoor Sahni) आणि लाडकी सून आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी देखील सोशल मीडियावर अनोख्या अंदाजामध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये आलियानं नीतू यांना दिलेल्या शुभेच्छांच्या पोस्टची सोशल मीडियावर खास चर्चा होत आहे.

नाकातून रक्त, श्वास घ्यायला त्रास, रणबीर कपूरला झालाय गंभीर आजार; लक्षणं आता आली समोर

रिद्धिमाची पोस्ट

रणबीर कपूरची मोठी बहीण रिद्धिमा कपूर साहनीनं तिच्या आईसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रिद्धिमानं नीतू यांच्याबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर तिनं लिहिलं की, ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू माझ्या आयुष्याची जीवनवाहिनी आहेत. तुझ्यावर मी कायम प्रेम करत राहीन…’ नीतू यांनी देखील त्यांच्या लेकीनं शेअर केलेल्या पोस्टला उत्तर दिलं आहे. त्यांनी हार्ट इमोजी शेअर करत तिचे आभार मानले आहेत.


आलिया भट्टची खास पोस्ट

नीतू यांची लाडकी सून आलियानंदेखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्या दोघींचा फोटो शेअर केला आहे. आलियानं शेअर केलेला हा फोटो तिच्या हळदीच्यावेळचा आहे. या फोटोमध्ये नीतू आलियाच्या कपाळाचे प्रेमानं चुंबन घेताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत आलियानं लिहिलेल्या फोटो ओळींची खूप चर्चा होत आहे. आलियानं आहे की, ‘भूतलावरील अत्यंत सुंदर आत्म्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझी सासू, मैत्रीण, लवकरच तू आजी होणार आहेस. तुला खूप सारे प्रेम.’

आलिया- नीतू

नीतू कपूर होणार आजी

सध्या नीतू खूपच आनंदात आहेत. कारण त्या लवकरच आलिया आणि रणबीर यांच्या बाळाची आजी होणार आहेत. काही दिवसांपूर्वी आलियानं इन्स्टाग्रामवरून ती लवकरच आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली होती. आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्न केलं होतं. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मोजके मित्रमैत्रिणी उपस्थित होते.

Neetu Kapoor Birthday- आयुष्य कसं जगायचं हे ६४ वर्षांच्या नीतू कपूरकडून शिकलं पाहिजे

दरम्यान, नीतू यांच्या कामाबद्दल सांगायचं तर अलिकडेच त्यांचा ‘जुग जुग जियो’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा सिनेमा नीतू यांच्यासाठी खास होता कारण नऊ वर्षांनी त्यांनी पुन्हा एकदा सिनेमात काम करायला सुरुवात केली आहे. २०१३ मध्ये ‘बेशर्म’ हा त्यांचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमात ऋषी कपूर आणि रणबीर कपूरदेखील होते.

मी विनोदाच्या चौकटीत नाही तर ‘फ्रेम’मध्ये बसतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here