अमरावती: अमरावती येथील बहुचर्चित उमेश कोल्हे हत्याकांडात आणि खुलासे झाले या प्रकरणाची देशभर चर्चा झाली. मात्र या प्रकरणाने कुटुंबीयांचे सांत्वन सोडून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला, अशी भावना त्यांचे भाऊ महेश कोल्हे यांनी व्यक्त केली.

अमरावती येथील कोल्हे कुटुंबीय मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यात उमेश कोल्हे हे वेटरनरी औषधांचे विक्रेता असल्याने त्यांचा संपर्क जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होता. मात्र त्यांनी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्याने त्यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.
अमरावती हत्या प्रकरण: NIA ऍक्शनमध्ये; तब्बल १३ ठिकाणी छापे; हाती लागले महत्त्वाचे पुरावे
उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएच्या हाती जाताच अमरावती जिल्ह्याचे नाव देशाच्या केंद्रबिंदूस्थानी आले. त्यामुळे कोल्हे कुटुंबियांकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढली. आमदार, खासदार नेत्यांपासून तर अभिनेत्यांपर्यंत अनेकांनी हजेरी लावली. यामुळे कुटुंबावर काय परिस्थिती ओढवली, याबद्दल त्यांचे भाऊ महेश कोल्हेंनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. उमेश गेल्याने आमच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आज तब्बल सोळा दिवस झाले. मात्र अजूनही आमच्या आयुष्यात शांतता नाही. कारण श्रद्धांजली सभा, शोकसभा, नेत्यांचे दौरे भाषण यामुळे जणू उमेशच्या हत्येचा इव्हेंट झाला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

अनेक लोक आमच्या कुटुंबीयांसोबत फोटो काढून समाज माध्यमांवर टाकू लागले आहेत. घरातील वातावरणावर याचा परिणाम झाला आहे. प्रत्येक संस्था, संघटना, कार्यकर्ते घरी येऊन आमच्याच भावाच्या श्रद्धांजली सभेचे आम्हाला निमंत्रण देऊ लागले. वेळ प्रसंगी आग्रह करून उपस्थित राहण्यासाठी गळ घालून घातल्याने त्याचा मानसिक त्रास आम्हाला होत आहे. त्यामुळे आम्ही आता आवाहन करत आहे की यापुढे श्रद्धांजली घ्या, पण आम्ही याच असा आग्रह करू नका, असे महेश कोल्हे म्हणाले.
Umesh Kolhe Murder Case Update: कोल्हेंना गुडघे टेकायला लावले, मग मानेवर चाकू फिरवला; नवा VIDEO समोर
आमचे कुटुंब अजूनही दुःखातून सावरलेले नाही. आम्हाला थोडा एकांत द्या. एकमेकांशी बोलू द्या. एकमेकांचा सहवास लाभून मनातील दबलेल्या भावना मोकळ्या होऊ द्या. उमेश गेल्याने घरातील पोकळी भरून निघालेली नाही. त्यातच सातत्याने होणारे इव्हेंट हे मनाला चटका लावणारे, अस्वस्थता निर्माण करणारे आहेत. त्यात अनेक कारवाया सुरू आहेत. त्यामुळे आम्हाला सहकार्य करा अशी विनंती उमेश कोल्हे यांचे भाऊ महेश कोल्हे यांनी महाराष्ट्र टाईम्ससोबत बोलताना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here