भांडवली बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे पहिल्या तिमाहीतील निकालांच्या घोषणांना आजपासून सुरुवात झाली. पहिला निकाल माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी या कंपनीनं घोषीत केला.

तीन सत्रातील पडझडीनंतर सोनं सावरलं ; कमॉडिटी बाजारात सोने महागले, चांदी मात्र स्वस्त
माहिती तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी असलेल्या टीसीएसला गेल्या वर्षी याच तिमाहीत ९,००८ कोटींचा नफा झाला होता. दरम्यान, नफ्यात केवळ ५ टक्के वाढ झाली असली तरी महसुलात मात्र मोठी वाढ झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीच्या महसुलात १६.२ टक्के वाढ झाली. एकूण ५२,७५८ कोटींचा महसूल मिळाला असल्याचे कंपनीनं म्हटलं आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ४५,४११ कोटींचा महसूल मिळाला होता.
टाटा समूहातील ‘ही’ कंपनी आणणार IPO ; तब्बल दोन दशकानंतर गुंतवणूकदारांना मिळणार संधी
नवीन आर्थिक वर्षाची कंपनीनं दमदार सुरुलात केली आहे. सर्वच विभागांमध्ये वृद्धी दिसून आली आहे, असे मत टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी व्यक्त केले. दरम्यान, कंपनीकडे अनेक नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत मात्र जागतिक पातळीवर झपाट्याने बदलणारी परिस्थिती आणि अनिश्चितता याकडे विशेष लक्ष असल्याचे गोपीनाथन यांनी सांगितले.
करदात्यांनो लक्ष द्या; ‘ITR’सादर करण्यापूर्वी ‘ही’ गोष्ट नक्की करा, होईल फायदा
टीसीएसकडे ८.२ अब्ज डॉलर्सची कंत्राटे प्रस्तावित आहेत. त्याशिवाय पहिल्या तिमाहीत कंपनीने १०० मिलियन डॉलर्स श्रेणीतील नऊ नवीन ग्राहकांना जोडले. ५० मिलिनय डॉलर्स श्रेणीतील १९ नवीन ग्राहक जोडण्यात कंपनीला यश आले. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रती शेअर ८ रुपयांचा अंतरिम लाभांश देण्यास मंजुरी दिली.
तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी भांडवली बाजारात टीसीएसच्या शेअरवर दबाव दिसून आला. आज दिवसअखेर टीसीएसचा शेअर ३,२६४.८५ रुपयांवर बंद झाला. त्यात ०.६७ टक्के घसरण झाली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : tcs profit rise declare rupees 8 dividend
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network