परभणी : पूर्णा रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या लोको शेड परिसरातील रेल्वे रुळावर अर्ध नग्न अवस्थेत एक ३० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अर्ध नग्न अवस्थेत आढळलेल्या युवकाच्या मृत्यूमागे घातपात आहे की आत्महत्या याविषयी उलट सुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहेत. याप्रकरणी, रेल्वे पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

पूर्णा शहरातील इक्बाल नगरीतील लोको शेड मधून नांदेड ते अकोला हा मार्ग जातो. या नांदेड – अकोला मुख्य लाईन वर एका ३० वर्षीय युवकाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह रेल्वे रुळाच्या मधोमध पडला असल्याची माहिती पूर्णा शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. सदरील युवकाने आत्महत्या केली आहे की त्याची कोणी हत्या केली आहे. या घटनेची माहिती त्या ठिकाणी जमा झालेल्या नागरिकांनी रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी रवी राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मयत व्यक्तीजवळ त्याची ओळख पटेल अशी कुठलीही कागदपत्र आढळून आले नाहीत. अनोळखी इसमाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पूर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका, मुख्यमंत्र्यांचे पोलिस महासंचालकांना निर्देश
याविषयी पोलीस कर्मचारी रवी राठोड यांना विचारणा केली असता नांदेडवरून पुण्याकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीखाली हा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती रेल्वे चालकाने स्थानक प्रमुखाला दिली. त्यावरून रेल्वे पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात हे तपासात समोर येणार आहे.

तुमचं बँक खातं बंद होणार, भाजीविक्रेत्याला घाबरवलं, सायबर भामट्याने घबाड लुटलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here