ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना राज्य निवडणूक आयोगानं कमी पाऊस असलेल्या ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींची निवडणूक जाहीर केली आहे. मतदान १८ ऑगस्टला होणार असून १९ ऑगस्टला निकाल जाहीर होईल.

 

Election
९२ नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
मुंबई : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं राज्यातील जनतेचं निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगानं ९२ नगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आहे. आता १८ ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. १७ जिल्ह्यातील कमी पाऊस पडणाऱ्या नगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणूक पार पडणार आहे.

maharashtra municipal council election.

९२ नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम

निवडणुकीचा कार्यक्रम
जिल्हाधिकारी कार्यक्रम जाहीर करणार : २० जुलै
उमेदवारी अर्ज उपलब्ध : २२ ते २८ जुलै
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २२ ते २८ जुलै
अर्जाची छाननी : २९ जुलै
अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ ऑगस्ट दुपारी ३ पर्यंत
उमदेवारी अर्जावरील आक्षेप : ८ ऑगस्ट
मतदानाचा दिनांक : १८ ऑगस्ट
मतमोजणी आणि निकाल : १९ ऑगस्ट

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra state election commission declare election dates for 92 municipal council election check details here
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here