औरंगाबाद जिल्ह्यातील विद्युत रोहित्राचे काम करण्यासाठी गेलेल्या चार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तारांमध्ये वीजप्रवाह उतरल्याने शाॅक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कन्नड तालुक्यातील नंदगीरवाडी येथे आज घडली.

हायलाइट्स:
- विजेचा शाॅक लागून ४ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जागीच मृ्त्यू
- औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील नंदगीरवाडी येथील घटना
- घटनेमुळे सर्व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
मिळालेली माहितीनुसार, चारही मृत कर्मचारी कन्नड तालुक्यातील रहिवाशी असून नंदगीरवाडी येथे विद्युत रोहित्र बसविण्याचे काम सुरू होते. त्यासाठी चौघांना ठेकेदार तार ओढण्यासाठी घेऊन गेले होते. दरम्यान, त्या तारांमध्ये अचानकपणे वीजप्रवाह उतरला अन् काही कळण्याच्या आतच चौघांचा शाॅक लागून जागीच मृत्यू झाला. ही बाब निदर्शनास येताच उपस्थितांनी वीजप्रवाह बंद केला.
घटनेची माहिती मिळताच, पोलिस आणि महावितरण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नेमकं कुणाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : four killed in aurangabad accident while repairing transformers
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network