नांदेड येथील उत्तरवार यांच्या कडून १ कोटी रुपयांचे सुवर्णमुकुट आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रखुमाईला अर्पण करण्यात येणार आहेत. आषाढी एकादशी १० जुलै रोजी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी शासकीय महापूजा होणार आहे.

 

Vijaykumar Uttarwar
उत्तरवार दाम्पत्य

हायलाइट्स:

  • उत्तरवार यांच्या कडून १ कोटी रुपयांचे सुवर्णमुकुट
  • आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रखुमाईला अर्पण
  • आषाढी एकादशी १० जुलै रोजी
सोलापूर : नांदेड जिल्ह्यातील उमरीचे माजी नगराध्यक्ष आर्यवैश्य समाजसेवक विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मुर्तीला दोन सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचा संकल्प केला होता. त्या अनुषंगाने आषाढी एकादशीला तो पूर्णत्वास जाणार आहे. एकूण १९६८ ग्राम शुद्ध सोन्या पासून मुकुटांची निर्मिती करण्यात आली आहे. या मुकुटांची किंमत १ कोटी ३ लाख रुपये आहे.

विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार सराफ ह्यांच्या कडून हे मुकुट अर्पण करण्यात येणार आहेत. विजयकुमार व जयश्री उत्तरवार समवेत त्यांचे सुपुत्र ओमकार,अरविंद,अजय, अच्य्युत,व डॉ.अनंत उत्तरवार या कार्यक्रमावेळी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विजयकुमार उत्तरवार यांनी हिंगोली येथे पत्रकार डॉ. विजय नीलावार यांच्या निवासस्थानी दिली.
राष्ट्रगीतानं दिंडीची सुरुवात, राष्ट्रभक्तीचा जागर,लोहसरच्या वारकऱ्यांची अनोखी दिंडी
कोरोनाच्या सुरुवातीला विजयकुमार उत्तरवार यांनी उमरी न.प.,सरकारी दवाखाना,व पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांच्या कार्यागौरवार्थ लाखो रुपयांची देणगी दिली होती.त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल त्यांचा व कुटुंबीयांचा सत्कार त्यांचे भाचे डॉ.विजय नीलावार यांनी केला.या कार्याचं वारकरी संप्रदाय कडून कोतुक होत आहे. नांदेड येथील हे उत्तरावर कुटुंब उद्या विठुरायला 1 कोटी रुपयांचे दोन सुवर्ण मुकुट अर्पण करणार आहेत . त्यांना ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंदिराला द्यायचे आहेत.
अखेर परिपत्रक जारी, वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफीचा मार्ग मोकळा
वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६ जुलै रोजी कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या निर्णयानंतरही वारकऱ्यांच्या वाहनांना टोल आकारला जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अखेर राज्य सरकारकडून यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार वारकऱ्यांच्या वाहनांचा टोल माफ करण्यात येणार आहे. पंढरपूरला आषाढी एकादशी यात्रेसाठी जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी मिळेल याची खात्री संबंधित विभागाने करावी,अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या आहेत.याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
दे धक्का… दुसरा सामना जिंकत भारताला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, संघनिवड ठरणार डोकेदुखी

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ashadhi ekadashi 2022 nanded uttarwar family donate gold crown to vitthal and rakhumai temple pandharpur
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here